शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

तीन जिल्ह्यातील गरजूंसाठी २१ टन ऑक्सिजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:39 IST

फलटण : लोणंद येथील सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून २१ टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरात लवकर याचे ...

फलटण : लोणंद येथील सोना अलाईज कंपनीच्या माध्यमातून २१ टन ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरात लवकर याचे उत्पादन सुरू होऊन तीन जिल्ह्यातील गरजूंना याचा उपयोग होणार आहे. कोरोना काळात जनतेला दिलासा देण्यासाठी जनतेच्या मागे ठामपणे उभे असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांंनी दिली.

फलटण नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी कोरोनाबाधितांना मोफत सेवा देण्याच्या उद्देशाने स्वखचार्तून उभे केलेल्या सजाई गार्डन कोविड केअर सेंटरचे लोकार्पण रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रामराजे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदार यांनी एकत्रितपणे काम केले तर जिल्ह्यातील नागरिकांना काहीही कमी पडणार नाही. नागरिकांनी मास्क वापरणे सोडल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. नागरिकांनी नियम पाळले तर कोरोनाचे संकट दूर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले. फलटण शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सर्वत्र घबराट निर्माण झाली आहे. शहरातील सर्व हॉस्पिटल्समध्ये असणारे बेड्स हे कोरोनाबाधितांसाठी पुरेनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील व तालुक्यातील कोरोनाबाधितांसाठी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी १०० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सुरु केल्याचे समाधान आहे. या सेंटरमध्ये २८ ऑक्सिजन बेड तर ७२ सर्वसाधारण बेड कोरोनाबाधितांसाठी तयार करण्यात आले आहेत. नंदकुमार भोईटे यांचे कार्य वाखणण्याजोगे आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याचे चेअरमन रणधीर भोईटे, नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, सनी अहिवळे, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, ऋतुराज भोईटे व किरण भोईटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

(चौकट)

उपजिल्हा रुग्णालयाबाबत नाराजी...

उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभाराविषयीच्या काही गोष्टी उपस्थित पत्रकारांनी रामराजेंच्या निदर्शनाला आणून दिल्या. त्याबाबत रामराजेंनी नाराजी व्यक्त करून प्रांताधिकारी यांना तातडीने वारिष्ठांकडे याबाबतचा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले.

फोटो : २१ फलटण

फलटण येथे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी सुरू केलेल्या कोरोना सेंटरचे उद्घाटन रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक-निंबाळकर आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. (छाया : नसीर शिकलगार)