शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

क्लासमधील मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला २० वर्षांची शिक्षा; जिल्हा न्यायालयाचा निकाल 

By दत्ता यादव | Updated: December 14, 2022 22:08 IST

जामिनावर सुटल्यानंतरही केला बलात्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: शिक्षणासाठी क्लासमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी खासगी क्लास चालक समीर बाबासाहेब मुजावर (वय ३८, रा. करंजे नाका, सातारा) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी (पोक्सो) २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. ही घटना  २८ एप्रिल २०१८मध्ये घडली होती.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, सातारा शहरामध्ये एक खासगी क्लास होता. या क्लासमध्ये अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी येत होती. यावेळी खासगी क्लासमधील शिक्षक समीर मुजावर याने त्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखविले. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर त्याने बलात्कार केला. अश्लील व्हिडीओ तिच्या मोबाइलवर पाठवले तसेच मुलीचेही अश्लील व्हिडीओ तयार केले. तीअल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने मुलीचे अपहरण केले. यानंतर मुलीच्या आर्इने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्यात त्याला अटकही झाली. परंतु काही दिवसानंतर तोजामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा मुलीला फूस लावून विवाह करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर बलात्कार केला. सातारा शहर आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात समीर मुजावर याच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते.

पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयापुढे आलेले १४ साक्षीदार आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने समीर मुजावर याला २० वर्षे सक्तमजुरी आणि ५२ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मंजुषा तळवलकर यांनी काम पाहिले. प्रॉसिक्यूशन स्कॉडचे सहायक फाैजदार अविनाश पवार, शमशुद्दीन शेख, अमित भरते यांनी त्यांना सहकार्य केले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Satara areaसातारा परिसर