शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

२० जणांचे झाले ‘बॅड’ मॉर्निंग

By admin | Updated: July 21, 2016 23:31 IST

गुडमॉर्निंग पथकाची कारवाई : सकाळच्या प्रहरी पोलिस स्टेशनची स्वारी

तारळे : तारळे सह विभागात गुडमॉर्निंग पथकाने अचानक धरपकड मोहीम राबवून उघड्यावर शौचास बसलेल्या ३० जणांना ताब्यात घेतले. पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेकांची सकाळी सकाळी ‘बॅड’ मॉर्निंग झाली. तर सकाळच्या प्रहरी त्यांना चक्क पोलिस स्टेशनची स्वारी करावी लागली. सुमारे दोन वर्षांपूर्वी निर्मलग्राम योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून वेळोवेळी गुडमॉर्निंग मोहीम राबविली गेली. याचा धसका घेऊन अनेकांनी शौचालये बांधून ही मोहीम फत्ते केली. ग्रामसेवकांनी वेळोवेळी लोकांना शौचालय बांधण्यासाठी आवाहनही केल्यावर त्यास प्रतिसाद देत अनेकांनी शौचालये बांधली तर काहींनी नाही. परिणामी गावातील शौचालये न बांधलेल्यांकडून गावाच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण केले जाऊ लागले. यावर उपाय शोधण्यासाठी व ग्रामस्थांची त्रासातून सुटका करण्यासाठी पाटण पंचायत समिती, ग्रामसेवक, गटविस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व तारळे पोलिस दूरक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुडमॉर्निंग पथक तयार केले.या पथकाने गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून गटविस्तार अधिकारी एस. डी. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तारळे, वेखंडवाडी, वजरोशी, कडवे, काटेवाडी, कोंजवडे, पांढरवाडी या गावांत पथकाने धडक कारवाई करून उघड्यावर शौचाला बसणाऱ्या २० जणांना पकडले. पथकामध्ये विस्तार अधिकारी एस. पी. घोलप, एस. व्ही. बोलके, सी. एस. पाटील, व्ही. जे. ढाणे, व्ही. के. ढाणे, व्ही. एल. लोखंडे, ए. एन. कागदी, के. यू. महाडिक, बी. बी. ढेबे, पी. बी. कांबळे, ए. बी. सोनावले, दीपक बारटक्के, व्ही. एस. काकडे, एस. बी. मोरे सहभागी होते. (वार्ताहर)