शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

खासगी सावकारीप्रकरणी २० जणांवर गुन्हा; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : व्याजाने घेतलेले पैसे माघारी देऊनही दमदाटी करीत अधिक रक्कम व धनादेश घेतल्याप्रकरणी सुमारे २० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.या प्रकरणात प्रदीप ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : व्याजाने घेतलेले पैसे माघारी देऊनही दमदाटी करीत अधिक रक्कम व धनादेश घेतल्याप्रकरणी सुमारे २० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली असून, त्याला दि. २९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.या प्रकरणात प्रदीप दत्तात्रय जाधव (वय २८), संदीप दत्तात्रय जाधव (दोघेही रा. संगमनगर-खेड, सातारा), बाळा खुडे, मयूर गवळी, रोहित (पूर्ण नाव, पत्ता नाही) आणि इतर अनोळखी १५ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. प्रदीप जाधवला अटक करण्यात आली आहे. त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विकास बापू माने (वय ३५, रा. शाहूनगर, सातारा) या व्यावसायिकाने तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार माने यांनी एकाकडून साडेतीन लाख रुपये १५ टक्के व्याजाने घेतले होते.माने यांनी संबंधिताला घेतलेले पैसे परत केले होते. तरीही व्याजाने पैसे देणाºयाकडून माने यांना अधिक पैशाची वारंवार मागणी करून दमदाटी करण्यात येत होती. साताºयातील महाराजा सयाजीराव विद्यालय परिसर, सदर बझार, आदी ठिकाणी दमदाटीचे प्रकार झाले. ‘आम्ही दत्ता जाधवची माणसे आहोत, हिशोब मिटवून टाक’ अशा धमक्याही देण्यात येत होत्या.अशाप्रकारे फिर्यादीकडून सुमारे एक लाख रुपये जबरदस्तीने अधिक घेण्यात आले. तसेच फिर्यादी मानेंकडून धनादेश घेऊन त्यावर संशयितांनी पाच लाखांचा आकडाही लिहिला. अशा कारणामुळे विकास माने यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली. या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे.