शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना १ कोटींचे नुकसान वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 17:26 IST

सागर गुजर सातारा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, फलटण व कऱ्हाड  या चार तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने ...

ठळक मुद्देजिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना १ कोटींचे नुकसान वाटपप्रशासनाची मदत : ३ कोटी ४७ लाखांचा निधी तहसीलदारांकडे वर्ग

सागर गुजरसातारा : जिल्ह्यातील सातारा, पाटण, फलटण व कऱ्हाड  या चार तालुक्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या लोकांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने आत्तापर्यंत १ कोटी ५५ हजार रुपयांची मदत केली आहे.या चारही तालुक्यांत अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. नद्या, ओढ्यांना पूर आल्याने काठावरच्या घरांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी घरांवर दरडी पडल्या. तर अनेक घरे जमीनदोस्त झाली. १३ घरे पूर्णत: पडली. तर ४ हजार ६२४ घरांचे अंशत: नुकसान झाले. जनावरांचे ३२ गोठे पडले.प्रशासनाने सुरुवातीला जीवितहानी टाळण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले. नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलवले. त्यामुळे जीवितहानी कमीत कमी झाली. आता नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे काम सुरु आहे. शहरातील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार रुपये व ग्रामीण भागातील नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १0 हजार रुपये देण्यात येत आहेत.जिल्ह्यातील २ हजार ७0४ लोकांना गहू, तांदूळ वाटप केला आहे. याव्यतिरिक्त ११ हजार ७९५ लिटर केरोसीनचे वाटप केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागातून देण्यात आली.नुकसानग्रस्तांना तालुकानिहाय दिलेली मदत

  1. सातारा : ४0 हजार
  2. पाटण : ६६ लाख ५ हजार
  3. कऱ्हाड : ९६ लाख ८0 हजार
  4. फलटण : ४0 हजार

नुकसान असेहीदुभती जनावरे १५, लहान जनावरे ७ तर २१00 कोंबडल्या अतिवृष्टीच्या काळात मृत्युमुखी पडल्या. शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून याचे पंचनामे सुरु आहेत.पुरात वाहून गेलेल्यांना प्रत्येकी चार लाखपुरात वाहून जाऊन मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात आले आहेत. सातारा तालुक्यातील कुसवडे येथील सागर बल्लाळ, कामथी तर्फ सातारा येथील लता चव्हाण, खंडाळा तालुक्यातील सतीश कचरे, रुळे गावचे पांडुरंग शिंदे हे अतिवृष्टीच्या काळात मृत्यूमुखी पडले. त्यांच्या कुटुंबीयांना प्रशासनाच्यावतीने प्रत्येकी चार लाखांची मदत करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Satara Floodसातारा पूरcollectorजिल्हाधिकारी