शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

१७१ ग्रामपंचायतींचे धूमशान

By admin | Updated: September 28, 2015 23:34 IST

१ नोव्हेंबरला मतदान: ३८६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचाही समावेश

सातारा : सातारा जिल्ह्यातील नोव्हेंबर व डिसेंबर २0१५ रोजी मुदत संपणाऱ्या १७१ सार्वत्रिक तर ३८६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. १ आॅक्टोबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी मंगळवार, दि. १३ ते १७ आॅक्टोबर या कालावधीमध्ये सकाळी ११ ते ४ यावेळेत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. दि. १९ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते ३ यावेळेत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप करण्यात येईल. तसेच निवडणूक लढणाऱ्या अंतिम उमेदवारी यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने दि. ४ नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.सार्वत्रिक निवडणुकांची व कंसात पोटनिवडणुकांची तालुकानिहाय आकडेवारी अशी : सातारा : ९३ (३९), कोरेगाव : ६ (३२), जावली : २0 (६३), कऱ्हाड : ५ (२४), पाटण : ११ (७८), वाई : ६ (४३), महाबळेश्वर : १९ (४२), खंडाळा : ३ (१५), फलटण : २ (१२), खटाव : २ (३५), माण : ५ (३)सातारा तालुक्यातील कोडोली, अंगापूर, भरतगाव, भाटमरळी, चिंचणेर वंदन, कोरेगाव तालुक्यातील देऊर, वाठार किरोली, जावलीतील भालेघर, महामूलकरवाडी, शेते, मोहाट, कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज, कोपर्डे हवेली, तांबवे, पाटण तालुक्यातील पाचपुतेवाडी, वाई तालुक्यातील जांभ, ओझर्डे, केंजळ, महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी, चतूरबेट, उंबरी, बिमरणी, नाकिंदा, खंडाळा तालुक्यातील मोर्वे, वडगाव, धनगरवाडी, फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी, पिराचीवाडी, खटाव तालुक्यातील वेटणे, पुनवडी, माण तालुक्यातील शिंगणापूर, इंजबाब, देवापूर, रांजणी या प्रमुख गावांच्या निवडणुका होणार आहेत. (प्रतिनिधी)आचारसंहिता लागूकायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निवडणूक लागलेल्या एकूण ५५७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत सोमवार, दि. २८ च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली. या ग्रामपंचायतीच्या हद्दींमध्ये राजकीय विकासकामांच्या कार्यक्रमांवर बंदी असणार आहे.