शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Satara :लस मिळाली १५ हजार डोस; जिल्ह्यातील काही केंद्रेच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:10 IST

Corona vaccine Satara : सातारा जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू झाले असले, तरी चार दिवसांनंतर जिल्ह्याला लसीचे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १४,७०० डोस मिळाले, पण यामधून काही केंद्रच सुरू झाली. लसीचा तुटवडा कायम असल्याने, तीन दिवसांच्या बंद नंतरही जिल्ह्यातील लसीकरण अडखळतच सुरू आहे.

ठळक मुद्देलस मिळाली १५ हजार डोस; जिल्ह्यातील काही केंद्रेच सुरू तुटवडा कायम : तीन दिवसांच्या बंद नंतरही कोरोना लसीकरण अडखळत

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू झाले असले, तरी चार दिवसांनंतर जिल्ह्याला लसीचे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १४,७०० डोस मिळाले, पण यामधून काही केंद्रच सुरू झाली. लसीचा तुटवडा कायम असल्याने, तीन दिवसांच्या बंद नंतरही जिल्ह्यातील लसीकरण अडखळतच सुरू आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली.

दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली, तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे. आता १ मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला.जिल्ह्यात ९ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी असून, १८ ते ४४ वयोगटांतील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत. जिल्ह्याला लस उपलब्ध होईल, त्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून केंद्रांत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. रोटेशनप्रमाणे केंद्रे सुरू असतात. या ठिकाणी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. असे असले, तरी जिल्ह्याला ३० एप्रिल रोजी पुण्यातून लस मिळाली होती. त्यानंतर, मंगळवारी रात्री मिळाली. ४ दिवस जिल्ह्यात लसच आली नव्हती. त्यामुळे लसीकरण मोहीम थांबली होती.

आता ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी १४,७०० डोस मिळाले आहेत, पण हे डोस कमीच पडणारे आहेत. कारण जिल्ह्यात दररोज किमान २० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. आता मिळालेल्या लसीत काही केंद्रच सुरू झाली, पण नंतर काय अशी स्थिती आहे.१८ ते ४४ वयोगटांसाठी १२ हजार डोस...जिल्ह्यात १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी लस देण्यात येत आहे. मंगळवारी रात्री या वयोगटसाठी १२ हजार डोस मिळाले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSatara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या