कऱ्हाड पालिकेची १५ कोटी ७७ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:39 AM2021-04-08T04:39:09+5:302021-04-08T04:39:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील ६८ टक्के नागरिकांनी संकलित व पाणीपट्टीचा कर भरला आहे. त्यातून पालिकेला सुमारे ...

15 crore 77 lakhs recovered by Karhad Municipality | कऱ्हाड पालिकेची १५ कोटी ७७ लाखांची वसुली

कऱ्हाड पालिकेची १५ कोटी ७७ लाखांची वसुली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कऱ्हाड : कऱ्हाड शहरातील ६८ टक्के नागरिकांनी संकलित व पाणीपट्टीचा कर भरला आहे. त्यातून पालिकेला सुमारे १५ कोटी ७७ लाख ४४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या संकट काळातही कर भरुन कऱ्हाडमधील नागरिकांनी सहकार्य केले आहे.

पालिकेच्या कर विभागाचे यावर्षी २३ कोटी १७ लाख ४६ हजार कर वसुलीचे उद्दिष्ट होते. पैकी ६८ टक्के वसुली पूर्ण झाली आहे. शहरातील १९ हजार २९७ पैकी १३ हजार १२२ मिळकतदारांनी कर भरला आहे.

करवसुली विभागाचे प्रमुख उमेश महादर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी १० टक्के जादा वसुली झाल्याचे पाहायला मिळते.

Web Title: 15 crore 77 lakhs recovered by Karhad Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.