शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जिल्ह्यातील धरणांमध्ये १४५ टीएमसी साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तरीही ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाल्याने प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तरीही यंदा ही धरणे भरण्यास उशीर लागला आहे. दरम्यान, उरमोडी वगळता इतर प्रमुख पाच धरणांमध्ये ९५ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीपेक्षा या धरणांमध्ये ३.६० टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षे चांगला पाऊस झाला. यामुळे सर्व धरणे ऑगस्ट महिन्यातच ओव्हरफ्लो झाली तसेच त्यातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेकवेळा धरणांतून पाणी सोडावे लागल्याने नदीकाठच्या गावांना धोकाही निर्माण झाला. दोन वर्षांपूर्वी तर कोयना, कृष्णा, वेण्णा, नीरा या नद्या पात्र सोडून वाहत होत्या. आताही पावसाळा सुरू होऊन तीन महिने होऊन गेले आहेत.

यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर तीन आठवडे पावसाची उघडीप होती. पण, जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागात तर तीन दिवस धुवाँधार पाऊस कोसळत होता. यामुळे शेती, पिके, रस्ते, घरे यांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अतिवृष्टीमुळे प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयनासारख्या धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाणी आले. तसेच इतर धरणांमध्येही पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करावा लागला. त्यानंतर जवळपास एक महिना पावसाची उघडीप होती. त्यामुळे धरणे भरणार का? अशी चिंता होती. पण, सप्टेंबर महिन्यात पाऊस झाला. यामुळे उशिरा का असेना धरणे भरत आली आहेत.

जिल्ह्यातील धोम, कण्हेर, कोयना, बलकवडी, उरमोडी, तारळी या सहा प्रमुख धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी यावेळी या धरणांमध्ये १४८.९१ टीएमसी पाणीसाठा होता, तर सध्या १४५.३१ टीएमसी इतका आहे. गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्गही झाला होता. त्यामुळे सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे. तरीही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे वर्षभराची चिंता नक्कीच संपली आहे.