शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्रानं भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, हल्लेखोर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 16:58 IST

चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क-हाड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.

क-हाड (सातारा) : चाकूने भोसकून बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. क-हाड तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत रेल्वे रुळानजीक शनिवारी (18 नोव्हेंबर) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान हल्लेखोर पसार झाले आहेत. प्रथमेश संजय सपकाळ (वय 18 वर्ष)असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे  नाव आहे. प्रथमेश सपकाळ हा पाटण येथील रहिवासी होता. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पार्ले गावच्या हद्दीत भटकीमाळ नावाचे शिवार असून, या शिवारात रेल्वेरुळानजीक युवकाचा मृतदेह पडला असल्याची माहिती शनिवारी दुपारी क-हाड तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कॉलेजच्या गणवेशातील सुमारे 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. 

यावेळी पाहणी केली असता प्रथमेशच्या गळ्याजवळ तसेच पोटावर चाकूने भोसकल्याचे आढळले. प्रथमेशच्या खिशात महाविद्यालयाचे ओळखपत्र आढळल्याने त्याची ओळख पटली. प्रथमेशची हत्या सकाळच्या सुमारास झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. शिवाय, घटनास्थळी रक्ताने माखलेला चाकू तसेच एक रुमाल देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, प्रथमेशचे मारेकरी फरार आहेत. 

टॅग्स :Murderखून