शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

सांगलीत सलग १२ तास नाकाबंदी

By admin | Updated: April 22, 2015 00:26 IST

पोलीसप्रमुख रस्त्यावर : वाहतूक पोलिसांकडून ३१५ वाहनधारकांवर कारवाई

सांगली : वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवर मंगळवारपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडलीे. सकाळी नऊ ते रात्री नऊ अशी सलग १२ तास नाकाबंदी करुन तब्बल ३१५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ट्रीपल सीट बसून जाणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, परवाना नसणे याबाबत कारवाया केल्या. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत स्वत: कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते. दारुच्या नशेत वाहन चालविणे, वाहनांची कागदपत्रे जवळ न बाळगणे, क्रमांक नियमबाह्य लावणे, भरधाव वाहन चालविणे, ट्रीपल सीट जाणे, लायसन्स नसणे, मोबाईलवर बोलत दुचाकी चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी यापूर्वी अनेकदा कारवाई केली आहे. मात्र शे-दोनशे दंड भरुन वाहनधारक पुन्हा याच चुका करताना आढळून येतात. यामुळे पोलीसप्रमुख सावंत यांनी वाहतूक शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सकाळी नऊपासून शहरातील विविध चौकात नाकाबंदी लावून कारवाई सुरु झाली होती. मुख्य बसस्थानक, टिळक चौक, कॉलेज कॉर्नर, काँग्रेस भवन, पुष्पराज चौक, राममंदिर चौक, राजवाडा चौक, बायपास रस्ता, विश्रामबाग चौक, मार्केट यार्ड या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. मोबाईलवर बोलताना व ट्रीपल सीट बसून जाणारे अनेक वाहनधारक सापडले. पोलीसप्रमुख सावंत हे सायंकाळी या कारवाईत सहभागी झाले होते. बीट मार्शलच्या पथकास बोलावून घेऊन त्यांनाही गस्त वाढविण्याची सूचना केली. (प्रतिनिधी)कारवाईत ११० पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेत ७० पोलीस कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे. हा सर्व स्टाफ कारवाईत सहभागी झाला होता. याशिवाय पोलीसप्रमुख सावंत यांनी मुख्यालयातील ४० कर्मचारी उपलब्ध करुन दिले होते. अशा एकूण ११० कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सलग आठ दिवस ही मोहीम सुरु ठेवणार आहे. दुचाकी चालविताना मोबाईलवर बोलणारे अनेक वाहनधारक सापडले आहेत, असेही सावंत यांनी सांगितले.