शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
6
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
7
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
8
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
9
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
10
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
11
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
12
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
13
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
14
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
15
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
16
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
17
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
18
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
19
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट

राज्यातील २२१६, सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत; सोडतीकडे गावपुढाऱ्यांचे लक्ष

By दीपक शिंदे | Updated: June 14, 2023 12:15 IST

निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोडत कार्यक्रम राबविण्यात येणार

सातारा : राज्यातील २२१६ ग्रामपंचायतींच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यामध्ये जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२३ अखेर मुदत संपणाऱ्या, नवनिर्मित आणि चुकीची प्रभाग रचना झाल्याने निवडणूक होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी हा सोडत कार्यक्रम दि. १६ जून ते दि. १४ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे.याबाबत माहिती अशी, राज्यातील २२८९ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना पूर्ण झाल्या आहेत. प्रभाग रचना पूर्ण झालेल्या सर्व ग्रामपंचायतीसाठी आरक्षणाचा कार्यक्रम राबविणे क्रमप्राप्त आहे. समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या तसेच ओबीसी आरक्षणाची टक्केवारी निश्चित न झालेल्या अशा ७९ ग्रामपंचायतीवगळता उर्वरित २२१६ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. सातारा जिल्ह्यातील ११४ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमानुसार दि. १६ जूनला विशेष ग्रामसभेची सूचना देणे, दि. २१ जूनला विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. २२ जूनला सोडतीनंतर विभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप स्वरूप प्रसिद्ध करायचे आहे. प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना २३ जून ते ३० जूनपर्यंत करायच्या आहेत. या हरकतींवर उपविभागीय अधिकारी हे ६ जुलैपर्यंत अभिप्राय देतील. त्यानंतर अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकारी दि. १४ जुलैला मान्यता देतील तर दि. १४ रोजी प्रसिद्धी देण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत