शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

१११ निराधारांवर निवृत्तीवेतनाची ‘सावली’!

By admin | Updated: March 24, 2015 00:17 IST

गुढीपाडव्याचा मुहूर्त : गोरगरिबांना दरमहा देणार पाचशे

कातरखटाव : येथील सावली सांस्कृ तिक, शैक्षणिक व सामाजिक विकास संस्था कातरखटाव यांच्याकडून ज्याला खरंच कुणाचा आधार नाही, अशा १११ निराधार गरीब महिला, पुरुषांना दरमहा पाचशे रुपयांची निराधार योजना सुरू करण्यात आली. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्वांना रोख रक्कम देऊन त्यांना गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तानाजीशेठ बागल यांनी समाजाची बांधिलकी जोपासण्याचे चांगले कार्य हाती घेतले आहे. आपण सामाजाचे काही तरी देणे आहोत, अशी मनात आशा बाळगून बागल यांनी गोरगरिबांच्या हितासाठी चांगला उपक्रम हाती घेतला आहे.या कार्यक्रमाचे अतिथी कदम महाराज कदमवाडीकर यांच्या हस्ते प्रथम पाच लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. नंतर उर्वरित लाभार्थ्यांना संस्थेतील इतर सभासदांकडून वाटप करण्यात आले. तानाजीशेठ बागल यांची समाजासाठी असलेली तळमळ पाहून लाभार्थी भारावून गेले होते. कातरखटाव गावात त्यांनी आत्तापर्यंत ज्यांना खरंच राहण्याची सोय नाही, जागा आहे; पण आपलं स्वत:चं घर बांधता येत नाही, अशा बेघर तीन लाभार्थ्यांना घरे बांधून दिली आहेत.ज्या विद्यार्थ्याची परिस्थिती हालाकीची आहे व त्याची शिकायची फार इच्छा आहे, अशा विद्यार्थांचा खर्च स्वत: करणार आहेत. यावेळी तानाजीशेठ बागल व त्यांच्या पत्नी सुजन बागल या दोघांचा यावेळी गावचे सुपुत्र म्हणून संस्थेच्या सभासदांनी व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार केला. एकंदरीत पाडव्याच्या शुभमुहूर्तावर झालेल्या पेन्शन सोहळ्यास गावातील व परिसरातील लोकांची गर्दी दिसून येत होती. तानाजीशेठ बागल यांच्या पेन्शन योजनेस परिसरातून. चांगल्यारीतीने प्रतिसाद मिळत आहे. महिला व ज्येष्ठ नागरीकांमधून या योजनेचे कौतुक केले जात आहे. यावेळी संस्थेचे सचिव प्रशांत पाटील, सुजित बागल, बाबू काशीद, सरपंच राजेंद्र बागल, बाबूराव बागल,आसिफ मुल्ला, हिंदुराव बोडके, छगन बागल कार्यकर्ते, महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत होता. (वार्ताहर)गोरगरिबांसाठी असेच नेहमी सामाजिक कार्य करीत राहणार, जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहणार .-तानाजीशेठ बागल. आमचं आयुष्य गेलं; पण असा वेगळा पेन्शन योजना उपक्रम या गावात कधी पाहिला नाही. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पाचशे रुपये निराधार लोकांना पेन्शन चालू केल्यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत, सावली संस्थेने आम्हाला म्हातारपणी सावली दिल्यासारखे आहे.- सुभद्राबाई लोहार, लाभार्थी,