शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

खेळताना लहान भावाला लागलं, वडील रागवतील म्हणून ११ वर्षाच्या शुभ्राने जीवनच संपविले; साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 11:59 IST

आई-वडील वडापावच्या स्टाॅलवर गेल्यानंतर लहान भाऊ आणि बहिणींना शुभ्रा सांभाळत असे

कोरेगाव (जि.सातारा) : घरात खेळता-खेळता लहान भावाच्या डोळ्याला तिच्याकडून चुकून लागलं. वडील घरी आल्यानंतर रागवतील, या भीतीने सहावीत शिक्षण घेणाऱ्या अकरा वर्षांच्या मुलीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही धक्कादायक घटना वडूथ (ता.सातारा) येथे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. शुभ्रा प्रवीण राणे (वय ११) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.प्रवीण राणे यांचे मूळ गाव रत्नागिरी आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून वडूथ येथे ते कुटुंबासमवेत वास्तव्यासाठी आले. साताऱ्यातील सदर बझारमध्ये पती-पत्नीने वडापावचा स्टाॅल सुरू केला. त्यांना तीन मुली व एक मुलगा. हे दोघे वडापावच्या स्टाॅलवर गेल्यानंतर लहान भाऊ आणि बहिणींना शुभ्रा सांभाळत असे. सोमवारी सायंकाळी तिच्या लहान भावाच्या डोळ्याला तिच्याकडून चुकून लागलं. त्यामुळे ती घाबरली. रात्री वडील घरी आल्यानंतर रागावतील आणि मारहाण करतील, अशी भीती तिला वाटली. तिने भावाला आणि बहिणींना बाहेरच्या खोलीत जावा, असं सांगितलं. यानंतर, तिने खुर्चीवर डबा ठेवून ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार तिच्या लहान बहिणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली. शेजाऱ्यांनी हे दृश्य पाहून तत्काळ तिच्या वडिलांना याची माहिती दिली. वडील प्रवीण राणे यांनी तातडीने घरी येऊन मुलीचा गळफास सोडवून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी तिला तपासले असता, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले.