पाटण : पाटण वनविभागाने यावर्षीच्या पावसाळी हंगामाचा फायदा उठविण्यासाठी सुमारे ८५८२५ रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले असून विविध जातींच्या वृक्ष लागवडीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नरक्या (अमृता) या औषधी वनस्पतींची ११ हजार रोपे रासाटी येथील रोपवाटिकेत तयार केली आहेत. यापूर्वी पाटण वनविभागाने पाचगणी येथील वनक्षेत्रात १५ हेक्टर जमिनीत नरक्या या वनस्पतीची लागवड केली आहे.पाटण वनविभागाच्या अखत्यारित तालुक्याचे एकूण १२ हजार ७७५ हेक्टर वनक्षेत्र असून, मल्हारपेठ, बहुले, चाफळ, पाटण, कारवट, मोरागिरी, गोवारे, पाचगणी, होरोशी, धायटी, तारळे अशी बारा बीट आहेत. पाटण विभागाचे खास वैशिष्ट्य हे कोयना येथील रासाटी रोपवाटिका असून त्याठिकाणी सध्या अडीच लाख रोपे आहेत. इत्यादी औषधी वनस्पतींच्या रोपांची निर्मिती केली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात धायटी, कारवट, बहुले येथे प्रत्येकी २७५२५ रोपांची लागवड करण्यात येणार आहे. यापूर्वी तीन वर्षांत केलेल्या वृक्षलागवडीमध्ये बोडकेवाडी येथील प्लॅन्टेशन नजरेत भरण्यासारखे तयार झाले असून गाळपट्टे काढणे, प्रतिबंधक उपाय, मातीची भर घालणे इत्यादी कामे वनकर्मचाऱ्यांनी केली आहेत. तालुक्यातील सोनाईचीवाडी, सडावाघापूर, बहुले, पाचगणी, धायटी, नुने, मळरोशी, वाटोळे येथे यापूर्वी विभागाच्यावतीने केलेली वृक्षतोड जीवंत आहे. (प्रतिनिधी) गवा हल्ल्यातील जखमींना मदतशिवंदेश्वर येथे गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तुकाराम दगडू बावधाने यांना १ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. ही घटना २६ जुलै २०१३ रोजी घडली होती. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास ८ लाखांची मदत दिली जाते.
वाटिकेत फुलली नरक्याची ११ हजार रोपे
By admin | Updated: June 5, 2015 00:18 IST