शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

आजीबाईबरोबर दहा महिन्यांच्या बाळानेही जिंकली ‘कोरोना’ची लढाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 17:28 IST

गेल्या आठवड्यात कराड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या 10 महिन्याच्या बाळावर आणि 78 वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते.  पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व यशस्वी उपचार करत, हे आव्हान यशस्वीपणे पार पाडत आज

ठळक मुद्देआजच्या या घटनेमुळे कराड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कृष्णा हॉस्पिटलमधून तिघांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

क-हाड : कोरोना हा कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र, त्यावर वेळीच योग्य उपचार झाले व त्यास रुग्णाने चांगला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. क-हाडमध्येही ७८ वर्षीय आजीबाई अन् १० महिन्याच बाळ यांनीही कोरोना विरोधातील लढाई बुधवारी जिंकली.

 येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ३ कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये सर्वात कमी वयाचा रुग्ण म्हणजे डेरवण येथील अवघे १० महिन्यांचे बाळ आणि सर्वात वयोवृद्ध रुग्ण म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. क-हाड) येथील ७८ वर्षीय महिला, ओगलेवाडी (ता. क-हाड) येथील २८ वर्षीय युवकाचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णांनी कृष्णा हॉस्पिटलच्या सोबतीने कोरोनावर केलेली मात प्रेरणादायी असून, आजच्या या घटनेमुळे क-हाड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

क-हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दि. ११ रोजी ओगलेवाडी येथील एक २८ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर लगेचच दुस-या दिवशी म्हणजेच दि. १२ एप्रिलला डेरवण येथील एक १० महिन्यांचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खूपच हळहळ व्यक्त केली जात होती. त्यातच पुन्हा म्हारुगडेवाडी येथील कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या, ७८ वर्षीय आईचा अहवाल दि. १५ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या तिघांवरही कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.गत आठवड्यात कºहाड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या १० महिन्यांच्या बाळावर आणि ७८ वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते; पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व यशस्वी उपचार करण्यात आले. कोरोनविरुद्धचे हे आव्हान यशस्वीपणे पार पाडत डॉक्टरांनी आजीबाई व बाळासह २८ वर्षीय युवकावरही यशस्वी उपचार केले.

बुधवारी या तिन्ही रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि अन्य स्टाफच्यावतीने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी या तिन्ही रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्स व स्टाफ उपस्थित होता.

 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSatara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल