शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाखांची मिरची पावडर जप्त

By admin | Updated: October 18, 2015 00:20 IST

कुपवाडमध्ये छापा : मक्याच्या पीठाची भेसळ?

सांगली : कुपवाड एमआयडीसीतील एम. जी. फूड इंडस्ट्रिज या कारखान्यावर अन्न औषध व प्रशासन विभागाच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा टाकून मिरची पावडर व मक्याचे पीठ असा दहा लाखांचा साठा जप्त केला. मिरची पावडरमध्ये मक्याचे पीठ भेसळ करीत असल्याच्या संशयावरून ही कारवाई केली असल्याचे सहायक आयुक्त डी. एच. कोळी यांनी सांगितले. सांगलीतील महेश मोहन वाठारकर यांची एम. जी. इंडस्ट्रीज फर्म आहे. या ठिकाणी मिरची पावडर तयार केली जाते; पण यामध्ये दहा टक्के मक्याची पावडर भेसळ केली जात असल्याची तक्रार अन्न औषध व प्रशासन विभागात आली होती. त्यामुळे या विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी ए. ए. पवार यांनी शनिवारी दुपारी अचानक भेट देऊन मिरची पावडरची पाहणी केली. त्यावेळी मिरची पावडरमध्ये मक्याचे पीठ भेसळ करीत असताना कामगारांना रंगेहात पकडण्यात आले. कारखान्याची पाहणी केल्यानंतर निर्यातीसाठी तयार केलेल्या मिरची पावडरच्या २५ किलो वजनाच्या ४२२ पिशव्या आढळून आल्या. त्याची किंमत साडेनऊ लाख रुपये आहे. तसेच मक्याच्या ७० किलो वजनाच्या १७ पिशव्या आढळून आल्या. त्याची किंमत १८ हजार रुपये आहे, असा एकूण नऊ लाख ६९ हजारांचा माल जप्त केला आहे. सायंकाळी सहापर्यंत ही कारवाई सुरू होती. मिरची पावडर पॅकिंगच्या पिशवीवर मे. एम. जी. फूड इंडस्ट्रिज या फर्मचा उल्लेख न करता बंटी फूडस्टफ, शारजाह, युएइ असा आखाती देशातील फर्मचा उल्लेख आहे. मिरची पावडरची विक्री आखाती देशातील ए-वन स्यूक स्पायसेस पॅकेजिंग अ‍ॅण्ड ए-वन मसूर ट्रेडिंग, शारजाह यांना विकत असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे कोळी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) नमुने पाठविणार कोळी म्हणाले की, एमजी इंडस्ट्रीजचे मिरची पावडरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना व्यवसायासाठी केंद्र सरकारचा परवाना घ्यावा लागतो. त्यांनी परवान्यासाठी अर्ज केला आहे. पण अद्याप त्यास मंजुरी मिळाली नाही. तरीही त्यांनी उत्पादन सुरू केले होते. जप्त केलेल्या मिरची पावडरचे नमुने तपासणीसाठी सोमवारी पाठविले जाणार आहेत. तपासणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.