शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची एक कोटी २९ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:23 IST

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ ...

खंडाळा : ‘दीड वर्षात दुप्पट रक्कम करून देतो,’ असे आमिष दाखवून खंडाळा येथील शेतकरी व महिलांना १ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी वैभव गोल्ड अँड ज्वेलर्सच्या धामणकर दाम्पत्यावर खंडाळा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. दरम्यान, दोघेही संशयित आरोपी फरार झाले आहेत.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खंडाळा येथील वैभव भास्कर-धामणकर व त्याची पत्नी नीलम यांच्या मालकीचे खंडाळा आणि वाई येथे ज्वेलर्सचे शोरुम आहेत. सन २०१६ मध्ये केसुर्डी (ता. खंडाळा) व परींंचे (ता. पुरंदर जि. पुणे) येथील शेतकºयांच्या जमिनी एमआयडीसीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. त्या मोबदल्यात मोठ्या रकमा या शेतकºयांकडे जमा झाल्या.ही माहिती धामणकर पती-पत्नीला मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांशी त्यांनी जवळीक निर्माण केली. तसेच ‘आम्ही सोन्याची बिस्किटे तयार करून परदेशी पाठवतो. त्यातून पैसे दामदुप्पट केले जातात. आपली संपत्ती मोठी आहे,’ असे भासवून शेतकºयांचा विश्वास संपादन केला.संबंधित पाच शेतकºयांना आपली रक्कम आमच्याकडे गुंतवा. दीड वर्षात दुप्पट रक्कम देतो. या रकमेचा चेक अथवा बँक खात्यावर देऊ, असे त्यांनी आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून या पाच शेतकºयांनी १ कोटी २९ लाख पन्नास हजार रुपये धनादेशाद्वारे धामणकर यांना दिले.मुदत संपल्यानंतर सर्वजण पैसे मागण्यास गेले असता धामणकर दाम्पत्याकडून रक्कम देण्यास टाळाटाळ होऊ लागली. काही शेतकºयांना दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. त्याचवेळी शेतकºयांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली. त्यानंतर त्यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन धामणकर दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यासाठी खंडाळापोलीस गेले असता दोघेही फरार झाले. फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील हे अधिक तपास करीत आहेत.आणखी तक्रारी वाढण्याची शक्यताआर्थिक आमिष दाखवून शेतकºयांची सुमारे दीड कोटीची फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर यात आणखी काही शेतकरी अडकले आहेत का? याबाबत पोलीस चाचपणी करीत आहे. औद्योगिकीकरणाच्या वाढीनंतर काही खासगी संस्था आणि वैयक्तिक लोकांकडे रक्कम वाढीसाठी गुंतवणुका केल्याचे यापूर्वीही उघडकीस आले आहे. त्यामुळे अशा व्यवहारात अडकलेल्या लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.