शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

Lok Sabha Election 2019 झेडपी सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी मोठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 23:58 IST

अशोक डोंबाळे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्हा परिषदेतील भाजपच्या काही सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ब्रम्हदेव ...

अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा परिषदेतील भाजपच्या काही सदस्यांची नाराजी नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ब्रम्हदेव पडळकरांकडून थेट विरोधात प्रचार सुरू आहे, तर शिवाजी डोंगरे, तम्मणगौडा रवी-पाटील यांच्या नाराजीकडे भाजपच्या नेत्यांचे बारीक लक्ष आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रचारात नाहीत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उर्वरित सदस्यांनी मात्र मतभेद बाजूला ठेवून प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे.जिल्हा परिषदेत शिवसेना, विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत आघाडीच्या मदतीने कमळ फुलले आहे. भाजपचे २५, रयत आघाडीचे चार, शिवसेनेचे तीन, विकास आघाडीचे दोन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक, असे भाजपकडे ३५ सदस्यांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीकडे अपक्षासह १५ आणि काँग्रेसचे १० अशी २५ सदस्यसंख्या आहे. आता काँग्रेस आघाडीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्यामुळे त्यांच्या संख्याबळात एकची भर पडणार, तर भाजपची संख्या एकने कमी होणार आहे.मागील दोन वर्षातील घडामोडींमुळे सध्या जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता डळमळीत झाली आहे. जिल्हा परिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य आणि सभापती ब्रम्हदेव पडळकर यांचे बंधू गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीचे सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत. पडळकर यांनी भाजपपासून फारकत घेतली असून, गोपीचंद पडळकरांच्या प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत.बुधगाव आणि कवलापूर जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करणारे शिवाजी डोंगरे आणि त्यांच्या पत्नी विद्या डोंगरे यांचाही भाजपच्या प्रचारात म्हणावा तितका सहभाग दिसत नसल्याची नेत्यांमध्ये कुजबूज आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आशा दाखवून भाजप नेत्यांनी फसवणूक केल्याची भावना डोंगरे यांच्या मनात सलत आहे. ते बोलून दाखवत नसले तरी, त्यांच्या प्रचारातील सहभागावरून तसे दिसत आहे. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती तम्मणगौडा रवी-पाटील यांनीही भाजप नेत्यांच्या कारभारावर टीका केली होती. त्यांचे काही कार्यकर्ते भाजपच्या प्रचारापासून दूर असल्याचे दिसत आहेत. तथापि जत, आटपाडी, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यातील सदस्य भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी असल्याचे दिसत आहे.बांधकाम व अर्थ समिती सभापती अरुण राजमाने यांनी मिरज पूर्वभागात संजयकाकांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.मिरज तालुक्यातील एरंडोली गटातील काँग्रेसच्या सदस्या जयश्री तानाजी पाटील आणि त्यांचे पती सलगरेचे सरपंच तानाजी पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसत नाहीत. दुसऱ्या बाजूला जयश्री पाटील यांच्या विजयासाठी मदत केली असून, त्याची जाण ठेवा, असे भाजपचे नेते तानाजी पाटील यांना सांगत आहेत. यामुळे तानाजी पाटील यांची ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे. .काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी असतानाही बोरगाव (ता. वाळवा) गटातील काँग्रेसचे सदस्य जितेंद्र पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजू शेट्टींच्या प्रचारात दिसत नाहीत. जितेंद्र पाटील यांनी आघाडीचा धर्म पाळण्याऐवजी, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारात सहभाग घेतला आहे.जितेंद्र पाटील दुरावलेराजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी जवळीक केल्यामुळेच जितेंद्र पाटील दुरावल्याची चर्चा आहे. मात्र कुरळपचे राष्ट्रवादीचे सदस्य संजीवकुमार पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी राजू शेट्टींच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक