शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षा होर्तीकर यांचा राजीनामा

By admin | Updated: June 18, 2016 00:14 IST

विभागीय आयुक्तांकडे सादर : इच्छुकांची मोर्चेबांधणी

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या तर्कवितर्कांना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी पुणे येथे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. नव्या अध्यक्षांना अत्यंत कमी कालावधी मिळणार असून, सत्ताधारी राष्ट्रवादीने अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे तासगाव तालुक्याला संधी मिळणार आहे. त्यात स्नेहल पाटील, योजना शिंदे, कल्पना सावंत यांची नावे चर्चेत आहेत. गेल्या महिन्यात जिल्हा परिषदेतील सभापतींची निवड झाल्यापासूनच अध्यक्षांचा राजीनामा व नवीन निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, अध्यक्षपदासाठी वाढलेली इच्छुकांची संख्या लक्षात घेता, सत्ताधारी राष्ट्रवादीने सबुरीचे धोरण घेतले होते. अखेर शुक्रवारी होर्तीकर यांना नेत्यांकडून आदेश मिळाला आणि सकाळीच त्या पुण्याला रवाना झाल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सत्ताधारी गटाचे नेते उपस्थित होते. विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी राजीनामा सादर केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ठरविल्याप्रमाणे पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षाची संधी मिळणार होती. मात्र, जिल्हा परिषदेच्या निवडणुका फेब्रुवारीत असल्याने नव्या अध्यक्षांना आता उण्यापुऱ्या नऊ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. अध्यक्षपद महिलेसाठी राखीव असून तासगाव तालुक्याला संधी दिली जाणार आहे. या तालुक्यातून स्नेहल पाटील, योजना शिंदे, कल्पना सावंत इच्छुक आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीची स्थिती अगोदरच दोलायमान अवस्थेत असल्याने नावाच्या निश्चितीनंतर दगाफटका होणार नाही, याची काळजी नेत्यांना घ्यावी लागणार आहे. अध्यक्षपदासाठी तासगाव तालुक्यातून नाव सुचविण्याचे अधिकार आमदार सुमनताई पाटील यांना देण्यात आले आहेत. मात्र, हे नाव निश्चित करताना आ. पाटील यांची कसोटी लागण्याची चिन्हे आहेत. आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाकडून लवकरच अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. (प्रतिनिधी)स्नेहल पाटील आघाडीवर अध्यक्षपदासाठी तासगाव तालुक्यात जोरदार चुरस आहे. कल्पना सावंत (सावळज), योजना शिंदे (मणेराजुरी) आणि स्नेहल पाटील (येळावी) यांनी नेत्यांकडे जोरदार मागणी केली आहे. यातील शिंदे अपक्ष सदस्य असल्या तरी त्या राष्ट्रवादी समर्थक आहेत. अध्यक्ष- पदासाठी शिंदे व सावंत यांच्यातील वादात स्नेहल पाटील यांना संधी मिळू शकते. नऊ महिन्यांची मिळणार संधीजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून डिसेंबरपासून आचारसंहिता, तर फेब्रुवारीत निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नव्या अध्यक्षांना केवळ नऊ महिन्यांचीच संधी मिळणार आहे. यातही आचारसंहिता व निवडणुकांची व्यवस्था लक्षात घेतली, तर फारच कमी कालावधी मिळणार आहे. विरोधकांना चमत्काराची अपेक्षा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत असले तरी त्यांच्यातीलच नाराजांची मोट बांधत अध्यक्षपदाच्या निवडीत धक्कातंत्र अवलंबण्याची अपेक्षा विरोधी काँग्रेसचे नेते बाळगून आहेत. यासाठीची चाचपणी करण्याचे सूचक वक्तव्यही नेत्यांनी केल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत चुरस वाढणार आहे.