सांगली : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या चांगल्या कार्याची दखल घेण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्काराने त्यांचा दरवर्षी गौरव करण्यात येत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी शिक्षकांचा पुरस्काराने गौरव झाला नव्हता. यामुळे दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषदेतील सभागृहात जिल्ह्यातील १९ शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिली.
आशाताई पाटील म्हणाल्या की, जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हा परिषद शाळेतील प्रकाश कलादगी (विजयनगर-म्हैसाळ, ता. मिरज), संदीप माने (केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ), धरेप्पा कट्टीमनी (उमराणी-कन्नड माध्यम, ता. जत), उद्धव शिंदे (शेगाव, ता. जत), वैशाली पाटील (बलगवडे, ता. तासगाव), प्रकाश चव्हाण (गोरेवाडी, ता. खानापूर), हैबतराव पावणे (गळवेवाडी, ता. आटपाडी), सुरज तांबोळी (गौडवाडी, ता. वाळवा), मंदाकिनी मोरे (चिंचोली, ता. शिराळा), अप्पासाहेब जाधव (हणमंतवडीये, ता. कडेगाव), अमोल साळुंखे (कुंडल, नंबर १. ता. पलूस) यांची निवड केली आहे.
गुणवंत शिक्षकांची पुरस्कारासाठी सचिन पाटील (सोनी नं. १, ता. मिरज), नारायण पवार (रायवाडी, ता. कवठेमहांकाळ), संजय लोहार (जिरग्याळ, ता. जत), आयेशा नदाफ (तुजारपूर, ता. वाळवा), रमण खबाले (मणदूर, ता. शिराळा), रघुनाथ जगदाळे (हिंगणगाव, ता. कडेगाव), सतीश नलवडे (वैभवनगर, ता. पलूस), रेहाना मुजावर (कुपवाड उर्दू शाळा, ता. मिरज) यांची निवड झाली आहे.