अंकलखोप : अंकलखाेप (ता. पलूस) येथील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी युवराज आनंदा भागवत यांची बिनविरोध निवड झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रमोद हजारे होते.
पलूसच्या सहायक निबंधक कार्यालयातील सचिन पाटणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. संस्थेचे सचिव विशाल सावंत यांनी विषय वाचन केले. युवराज भागवत यांचे नाव प्रमोद हजारे यांनी सुचविले. त्यास रवी पाटील यांनी अनुमोदन दिले. भागवत यांचा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अजित शिरगावकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
घनश्याम सूर्यवंशी, सरपंच अनिल विभुते, ज्येष्ठ नेते राजेंद्र पाटील, शामराव पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, एम. के. चौगुले, ‘क्रांती’चे संचालक शीतल बिरनाळे, हणमंत पाटील, गजानन सूर्यवंशी, ए. के. चौगुले, अशोक हजारे, माणिक सूर्यवंशी, संचालक शक्तिकुमार पाटील उपस्थित होते. संचालक बाळासाहेब मगदूम यांनी आभार मानले.