शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात धारदार शस्त्राने युवकाचा खून: खुनाचे कारण अस्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 23:49 IST

येथील भाजी मंडई नजीक असलेल्या हॉटेल सनशाईन परमिट रूम व बिअर बार मध्ये एका तरुणावर हल्ला झाला.

सुरेंद्र शिराळकर

आष्टा :  येथील भाजी मंडई नजीक असलेल्या हॉटेल सनशाईन परमिट रूम व बिअर बार मध्ये एका तरुणावर हल्ला झाला. या तरुणाचे नाव वैभव बाळू घस्ते (वय १९) असून तो राहणार आष्टा साठे नगर येथील आहे. त्याच्यावर अंकित राठोड राहणार आष्टा गांधीनगर याने छातीवर वार करून धारदार शस्त्राने खून केला. ही घटना सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान घडली. खुनाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने आष्टा शहरात खळबळ उडाली आहे.

घटनास्थळावरन मिळालेल्या माहितीनुसार, आष्टा येथील वैभव बाळू घस्ते हा युवक भाजी मंडई नजीक असलेल्या भर वस्तीतील हॉटेल सनशाईन बियर बार व परमिट रूम मध्ये गेल्यानंतर अचानक अंकित राठोड हा त्याच्याजवळ आला, व त्याने हातातील शस्त्राने त्याच्या छातीवर वार केला. यानंतर तो पळून गेला. वैभव घस्ते याला साजन अवघडे यांनी ॲम्बुलन्स मधून तातडीने आष्टा येथील एका खाजगी रुग्णालयात व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल  केले.

मात्र, उपचारापूर्वी वैभव घस्ते याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर सचिन गायकवाड यांनी सांगितले. अद्याप खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही.  आरोपी अंकित राठोड हा खून केल्यानंतर फरार झाला. आष्टा ग्रामीण रुग्णालय व हॉटेल सनशाइन परमिट रूम व बियर बार या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केली होती. आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार प्रवीण ठेपने याच्यासह आष्टा पोलिस अधिक तपास करीत आहेत.