शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
3
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
4
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
5
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
6
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
7
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
9
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
10
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
11
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
12
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
13
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
14
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
15
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
16
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
17
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
18
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
19
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

तुम्ही भ्रष्टाचार थांबवा, आम्ही स्टंटबाजी बंद करू अमित शिंदे : महापौरांचा तोल ढासळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:04 IST

सांगली : सुधार समितीने रस्ते व नागरी समस्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचा पोलखोल सुरु केल्याने महापौरांचा तोल ढासळला आहे. तुम्ही भ्रष्टाचार करणे थांबवा, आम्ही स्टंटबाजी थांबवतो,

सांगली : सुधार समितीने रस्ते व नागरी समस्यांच्या कामातील भ्रष्टाचाराचा पोलखोल सुरु केल्याने महापौरांचा तोल ढासळला आहे. तुम्ही भ्रष्टाचार करणे थांबवा, आम्ही स्टंटबाजी थांबवतो, असा टोला समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे व प्रा. आर. बी. शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत लगावला.ते म्हणाले की, सुधार समितीच्या आंदोलनांमुळे महापालिका क्षेत्रात रस्त्यांची कामे सुरु झाली आहेत. गेली साडेचार वर्षे रस्ते खराब असल्याचे महापौरांना दिसले नाही काय? निकृष्ट दर्जाची कामे करून लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा उद्योग सुरु आहे. कामाचे फलक लावले नाहीत. सह्याद्रीनगरचे काम कसे बनावट चालू आहे, त्याचा समितीने अधिकाºयांच्या समक्ष जाहीर पंचनामा केला आहे. तो पंचनामा अधिकाºयांनी देखील मान्य केला. त्याला स्टंटबाजी कोणत्या आधारावर म्हणता?, असा सवाल त्यांनी केला. सुधार समितीने कोणते काम बंद पाडले, ते महापौरांनी दाखवावे. फौजदारी करणार, अशी बालिश वक्तव्ये महापौरांनी करू नयेत. त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवावा, असेही आव्हान त्यांनी दिले.समक्ष पाहणी करावीसह्याद्रीनगर येथील रस्त्याच्या कामाची अधिकाºयांसह पाहणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले. या रस्त्याची महापौरांनी शुक्रवारी सकाळी १० वाजता समक्ष पाहणी करावी आणि काम कसे चालू आहे ते जाहीर करावे, असे आव्हान समितीने दिले.