शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

हळदीच्या हंगामास यंदा सोन्याची झळाळी येणार

By admin | Updated: January 4, 2017 23:03 IST

आवकेत वाढ अपेक्षित : जानेवारीअखेर हंगाम सुरु होणार

शरद जाधव ल्ल सांगलीसंपूर्ण देशातच नव्हे, तर परदेशातही हळदीची सर्वात सुरक्षित व दर्जेदार बाजारपेठ म्हणून असलेला सांगलीचा नावलौकिक वाढत चालला आहे. यंदा झालेले चांगले पाऊसमान व समाधानकारक दरामुळे यंदाच्या हळद हंगामात दोन ते अडीच लाख पोत्यांची वाढ अपेक्षित आहे. गेल्यावर्षी साडेआठ लाख पोत्यांची आवक झाली होती. सध्या शेतकऱ्यांकडून पाला कापणीस सुरुवात झाली असून २२ जानेवारी ते २५ जानेवारीपर्यंत मुहूर्ताने नवीन हंगामास सुरुवात होणार आहे. यंदा १५ जूनपर्यंत हंगाम सुरू राहणार असून मार्चपासून कडप्पा, सेलम, युरोड, सदाशिवपेठ, इकाराबाद, बेहरामपूर येथून हळदीची आवक सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा चांगले पाऊसमान झाल्याने हळदीचे उत्पादनही चांगल्या प्रतीचे झाले आहे. पहिल्या टप्प्यात चांगला दर मिळणार असला तरी, शेवटच्या टप्प्यात दरात घसरणीची शंकाही व्यक्त होत आहे. हळदीची निर्यात वाढणारगेल्यावर्षी सांगली बाजारपेठेतून जगभरात हळदीची चांगली निर्यात झाली होती. परदेशात हळदीचे आयुर्वेदिक महत्त्व माहीत झाल्याने हळदीचा वापर वाढत चालल्याने यंदाही निर्यात वाढण्याचा आशावाद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काही वर्षात हळद निर्यातीत चांगली वाढ होणार आहे.संपूर्ण देशात सर्वात सुरक्षित हळदीची बाजारपेठ असली तरी, शेजारील राज्यातील काही बाजारपेठेतही आता चांगल्या सुविधा देण्यात येत असल्याने व्यापारास आव्हान निर्माण झाले आहे. यंदा निजामाबाद येथून हळदीची आवक कमी होईल, अशी शक्यता हळद व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तिथे ई-टेंडरिंगेमुळे शेतकऱ्यांनी निजामाबाद बाजारपेठेला प्राधान्य दिले आहे. नोटाबंदीचा अंशत: परिणामवार्षिक ६५० ते ७०० कोटींची उलाढाल असलेल्या सांगलीच्या हळद बाजारपेठेवर नोटाबंदीचा अंशत: परिणाम झाला आहे. बाजारपेठेतील व्यवहार चेकने होत असल्याने चलनाचा तुटवडा जाणवला नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी एकूणच वातावरणामुळे हळदीच्या दरात मात्र ५०० ते ७०० रुपयांचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. अजून नवीन हंगामास सुरुवात झाली नसल्याने दरात घट झाल्याची शक्यता व्यापारी व्यक्त करीत आहेत. एकंदरीतच नोटाबंदीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेली अस्वस्थेचे वातावरण व शेतकऱ्यातील संभ्रम अवस्थेमुळे आवक घटली आहे.