शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर सुरक्षित, पण गाफीलपणामुळे मिरजेतील संपूर्ण कुटूंब कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 19:05 IST

corona virus Sangli : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने वर्षभर स्वत:ला घरात कोंडून घेतले. कोरोनापासून बचाव केला. पण महिन्याभरापूर्वी पाच मिनिटांचा गाफीलपणा नडला आणि कोरोनाने संपूर्ण कुटुंबाला ग्रासले. एका सदस्याचा मृत्यूही ओढवला.

ठळक मुद्देवर्षभर सुरक्षित भिंत पाच मिनिटांच्या गाफीलपणामुळे ढासळलीमिरजेतील संपूर्ण कुटूंब कोरोनाग्रस्त

संतोष भिसेसांगली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने वर्षभर स्वत:ला घरात कोंडून घेतले. कोरोनापासून बचाव केला. पण महिन्याभरापूर्वी पाच मिनिटांचा गाफीलपणा नडला आणि कोरोनाने संपूर्ण कुटुंबाला ग्रासले. एका सदस्याचा मृत्यूही ओढवला.मिरजेतील ही कहाणी कोरोनापासून दक्षतेसाठी मोलाचा धडा घालून देणारी ठरली आहे. कोरोनाबाधित जात्यात असले तरी बेफिकिरीने वागणारे सारेच सुपात आहेत असाच संदेश या घटनेने दिला आहे. पंढरपूर रस्त्यावरील एका वसाहतीत राहणार्या या कुटुंबाने गेल्यावर्षी मार्चमध्येच बाहेरच्या जगाशी संपर्क तोडून टाकला. पती-पत्नी, मुलगा आणि सून असे चौकोनी कुटूंब. वडील सेवानिवृत्त तर मुलगा पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीला.लॉकडाऊनमुळे मुलाचे वर्क फ्रॉम होम सुरु होते. कुटुंबाने किराणा, अ‍ौषधांसह अन्य जीवनावश्यक बाबी घरपोहोच मागविल्या. डिसेंबर ते फेब्रुवारीमध्ये कोरोनाचा आलेख खालावला तरी बाहेर पडले नाहीत. कोरोना संसर्गापासून स्वत:ला सुरक्षित ठेवले. सुरक्षेचा बुरुज वर्षभर मजबूत ठेवला.पण महिन्याभरापूर्वी बुरुजाला सुरुंग लागला. एका अपघातग्रस्त नातेवाईकावर मिरजेत शस्त्रक्रिया झाली.

रितभात म्हणून वडील विचारपूस करायला रुग्णालयात गेले. पाचच मिनिटांत परतलेदेखील. पण कोरोना जणू टपूनच होता. दोन-चार दिवसांत ताप चढला. कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आला. पाठोपाठ अन्य तिघेही कोरोनाग्रस्त झाले. मायलेकाला रुग्णालयात दाखल केले तर सासरा व सुनेवर घरगुती विलगीकरणातच उपचार झाले. उपचारानंतर मुलगा कोरोनामुक्त झाला, आईची प्रकृती मात्र दिवसेंदिवस गुंतागुंतीची बनत गेली. २३ दिवसांच्या अयशस्वी उपचारानंतर गुरुवारी (दि. २९) तिचे प्राणोत्क्रमण झाले. वर्षभराची सुरक्षिततेची भिंत पाच मिनिटांच्या गाफीलपणामुळे ढासळली.बाळ-बाळंतीण दोघेही कोरोनाबाधितदुर्दैवाचा फेरा येथेच संपला नाही. कोरोनाग्रस्त सुनेची प्रसुती झाली, तेव्हा बाळदेखील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोघेही स्वतंत्र उपचारानंतर कोरोनामुक्त झाले, पण तेवीस दिवस रुग्णालयात कोरोनाशी झुंजणार्या सासुला आपण आजी झाल्याचे शेवटपर्यंत कळाले नाही. घरात अपत्यप्राप्तीचा आनंद मानायचा की कर्त्यासवरत्या बाईच्या मृत्यूचा शोक करायचा असा प्रश्न कुटुंबापुढे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली