शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

यशवंतरावांचे स्मारक प्रेरणास्थान बनेल

By admin | Updated: June 27, 2014 01:02 IST

शरद पवार : देवराष्ट्रेत स्मारकाचे उद्घाटन

सांगली/देवराष्ट्रे : सामान्य कुटुंबातही कर्तृत्ववान माणसं जन्माला येऊ शकतात, ही गोष्ट यशवंतरावांच्या जन्मघराकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. त्यामुळे हे स्मारक महाराष्ट्रातील आणि बाहेरील तरुणांसाठी प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी गुरुवारी देवराष्ट्रे येथील कार्यक्रमात व्यक्त केला. देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मघर स्मारकाचे उद्घाटन गुरुवारी पवार यांच्याहस्ते करण्यात आले. स्मारक लोकार्पण सोहळ््यास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, पालकमंत्री पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, जलसंपदामंत्री (कृष्णा खोरे महामंडळ) शशिकांत शिंदे, खा. सुप्रिया सुळे उपस्थित होते. पवार म्हणाले की, यशवंतरावांच्या नावे विविध संस्था उभारण्यात आल्या. या लोकोपयोगी संस्थांनी त्यांच्या स्मृती जपल्या आहेत. मुंबईतील यशवंतरावांचे स्मारक व प्रतिष्ठानच्या उभारणीत वसंतदादांनी पुढाकार घेतला होता. यशवंतरावांनी राज्यासाठी व देशासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहण्यासारखे आहे. प्रशासकीय सेवेचा अनुभव त्यांना होता. त्यामुळे प्रशासक आणि प्रशासन यांना मानवी चेहरा असायला हवा, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. संसदेत काम करताना संसदीय कामकाजाची पथ्ये पाळण्याची खबरदारी घेणारे ते नेते होते. नेते अनेक होऊन जातात, पण कायमस्वरुपी आपला ठसा उमटविणारे कर्तृत्ववान लोक फार कमी असतात. कृष्णाकाठच्या मातीने अनेक कर्तृत्ववान माणसं जन्माला घातली. यात यशवंतरावांचे कार्य देशाला दिशादर्शक आहे. औद्योगिक, शेती, सहकार, शिक्षण, सामाजिक परिवर्तन अशा सर्वच क्षेत्रांना त्यांनी नवी दिशा दिली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनीही यशवंतरावांच्या अनेक आठवणी सांगितल्या. गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले, लोकोत्तर पुरुष म्हणून यशवंतरावांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. या मातीने मोठी माणसं जन्माला घातली ही गोष्ट खरी असली तरी, हयातीत त्यांना तो मोठेपणा मिळाला नाही. त्यांना अपमान सहन करतानाच संघर्षही करावा लागला. यशवंतराव पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकले नाहीत, याची खंत नेहमी सतावते. पालकमंत्री कदम म्हणाले की, यशवंतरावांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोनहिऱ्याचा हा परिसर विकसित करण्याचा निर्धार शासनाने केला होता. यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत. जयंत पाटील म्हणाले की, यशवंतरावांच्या पाऊलखुणांनी सोनहिऱ्याची भूमी सजली आहे. या परिसराच्या विकासाची कल्पना आता सत्यात उतरत आहे. कार्यक्रमास आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. मानसिंगराव नाईक, बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज देशमुख, प्रतिष्ठानचे कार्यक्रम संयोजक दत्ता सराफ उपस्थित होते. (प्रतिनिधी)