शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतरावांचे जन्मघर स्मारक दुर्लक्षितच- प्रतीक्षा ३५ वर्षांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:09 IST

अतुल जाधव । देवराष्ट : राजकारण करीत असताना समाजकारणाचा वसा घेऊन, कवडीचीही अपेक्षा न करता, राज्यासह देशाच्या उन्नतीसाठी आपले ...

ठळक मुद्देनिधीची तरतूद असूनही स्मारकाच्या कामात येतोय अडथळास्मारक पुरातत्व विभागाच्या ताब्यात, देखभाल प्रतिष्ठानकडे आणि निधी तिसरीकडेच

अतुल जाधव ।देवराष्ट : राजकारण करीत असताना समाजकारणाचा वसा घेऊन, कवडीचीही अपेक्षा न करता, राज्यासह देशाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या नवमहाराष्टचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे देवराष्ट येथील जन्मघर स्मारक त्यांच्या मृत्यूनंतर गेल्या ३५ वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. या स्मारकाची उपेक्षा संपणार कधी? हा प्रश्न चव्हाणप्रेमींना भेडसावत आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी देवराष्टÑेसारख्या छोट्याशा खेड्यात, अत्यंत गरीब आणि हलाकीच्या परिस्थितीत झाला. गरीब कुटुंबात जन्माला येऊन आणि कोणताही राजकीय वारसा नसतानाही संयुक्त महाराष्टÑाचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला. या नेत्याच्या देवराष्टÑे येथील जन्मघराचा प्रश्न कित्येक वर्षे रेंगाळत पडला आहे. येथील सि. स. नं. ५२५ मधील जन्मघराची इमारत शासनाच्या सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभागाने ८ फेबु्रवारी २००१ रोजी ऐतिहासिक स्मारक म्हणून घोषित केली. यानंतर पुरातत्व विभागाने मोडकळीस आलेल्या या जन्मघराची ६५ हजार रूपये खर्च करुन डागडुजी केली. मात्र याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर शासनाने जन्मघराची दुरुस्ती करण्यासाठी १० लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करुन दिला. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी बांधकाम करुन जन्मघरास पूर्वीची अवस्था प्राप्त करुन देण्यात आली. पुरातत्व खात्याने तेथे फलक लावून आपली जबाबदारी टाळली.

यशवंतरावांच्या जन्मघरासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी २ कोटी १७ लाखांचा आराखडा तयार करुन कामाला लवकरच सुरुवात करणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर याकडे गांभीर्याने लक्ष दिल्याचे दिसत नाही. निधी उपलब्ध असूनही स्मारक पुरातत्व विभागाच्या ताब्यात, देखभाल प्रतिष्ठानकडे आणि निधी तिसरीकडेच, अशी अवस्था दिसत आहे. त्यामुळे स्मारक विकासाचे काम प्रलंबित आहे.शासन निर्णयाची प्रतीक्षाशासनाने हे स्मारक राज्यवैभव संगोपन योजनेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे पाच वर्षांसाठी देखभालीसाठी दिले होते. या कराराला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. करार वाढवून मिळावा, यासाठी प्रतिष्ठानने विनंती केली आहे. मात्र अद्याप यावर निर्णय झाला नसल्याचे समजते. त्यामुळे सध्या हे स्मारक शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.

टॅग्स :SangliसांगलीYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाण