शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बेडगेत आढळला यादवकालीन शिलालेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:38 IST

सांगली जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथे मिरज इतिहास संशोधक मंडळाला आढळून आला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवीसन १२२२ मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून आठशे वर्षांपूर्वी मिरज आणि बेडग येथील व्यापाऱ्यांनी शिवमंदिराला दिलेला हा दानलेख आहे.

ठळक मुद्देबेडगेत आढळला यादवकालीन शिलालेखआठशे वर्षापूर्वीचा इतिहास : मिरज इतिहास संशोधन मंडळाला यश

सांगली : जिल्ह्याच्या यादवकालीन इतिहासावर नवा प्रकाश टाकणारा शिलालेख बेडग (ता. मिरज) येथे मिरज इतिहास संशोधक मंडळाला आढळून आला. देवगिरीचा यादव सम्राट सिंघण (दुसरा) याच्या काळातील इसवीसन १२२२ मधील हा शिलालेख हळेकन्नड लिपीत असून आठशे वर्षांपूर्वी मिरज आणि बेडग येथील व्यापाऱ्यांनी शिवमंदिराला दिलेला हा दानलेख आहे.मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेली काही वर्षे दक्षिण महाराष्ट्राच्या इतिहासावर अभ्यास सुरू आहे. हा अभ्यास करताना सांगली, सातारा, कोल्हापूर या जिह्यात वेगवेगळ्या गावात वीरगळ, सतीशिळा यावरील लेखांबरोबरच शिलालेख आणि ताम्रपटांचाही अभ्यास मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर करीत आहेत. या अभ्यासात त्यांना अनेक अप्रसिध्द लेख मिळून आले आहेत.बेडग येथे त्यांना राजवाड्यालगत असणाऱ्या महादेव मंदिरात एक शिलालेख आढळून आला. हा लेख भींतीमध्ये लावण्यात आला आहे. शिलालेख सुमारे तीन फुट उंचीचा असून, तो हळेकन्नड लिपीत आहे. हा शिलालेख दोन टप्प्यात असून, सध्या त्याच्या २८ ओळी वाचता येतात. शिलालेखाच्या वरील भागात मध्यभागी शिवलिंग असून, त्याच्या एका बाजूला सुर्य, चंद्र, नंदी आणि दुसऱ्या बाजूला गाय कोरली आहे. एक भक्त शिवलिंगाची पुजा करतानाही दाखविला आहे.या लेखात प्रारंभी देवगिरीचा यादव सम्राट दुसरा सिंघण याचा गौरव करणाऱ्या ओळी आहेत. माळवा, गुर्जर या देशातील राजांचा पराभव करणारा, होयसळ आणि तेलगू देशात वादळ माजविणारा प्रतापचक्रवर्ती सिंघण राजा देवगिरी येथे काव्य विनोदात सुखनैवपणे राज्य करीत असताना हे दान दिले असल्याचे यामध्ये म्हटले आहे. हा दान लेख शके ११४४ चित्रभानू संवत्सर, कार्तिक शुध्द प्रतिपदा यादिवशी म्हणजेच इसवी सन १२२२ साली दिला आहे. या लेखात सिंघण देवाचा सेनापती विक्रमदेव याचा उल्लेख आला आहे.त्यावेळी प्रसिध्द असणाऱ्या वीरवणंज या व्यापाऱ्यांच्या संघटनेचाही उल्लेख यामध्ये आला आहे. या संघटनेचे सदस्य असलेल्या अनेक व्यापाऱ्यांची नावे या लेखात दिली आहेत. यामध्ये मेटी सेट्टी, नानी सेट्टी, कुमार सेट्टी आणि या सगळयांचा प्रमुख असणारा सोमय्य यांसह अन्य व्यापाऱ्यांची नावे आहेत. यादव राजाचा सेनापती विक्रमदेव याच्यावतीने मल्लय नामक व्यक्तीमार्फत हा दान लेख दिल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :historyइतिहासSangliसांगली