शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कुस्ती बाहेर!, मल्ल-प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया

By श्रीनिवास नागे | Updated: October 7, 2022 17:49 IST

आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे.

सांगली : ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया येथे २०२६ मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धेतून कुस्ती खेळाला बाहेर करण्यात आले आहे. याचा मोठा फटका भारताला बसणार असून, कुस्तीप्रेमींची निराशा झाली आहे. या निर्णयानंतर मल्ल आणि प्रशिक्षकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशन (सीजीएफ) आणि कॉमनवेल्थ गेम्स ऑफ ऑस्ट्रेलियाने गुरुवारी व्हिक्टोरियामधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी वेळापत्रक जाहीर केले. या स्पर्धेत नेमबाजीचा पुन्हा समावेश केला गेला, तर कुस्तीला वगळण्यात आले.यावर्षीच्या बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने कुस्तीत सहा सुवर्णांसह १२ पदके जिंकली आहेत. आतापर्यंत ‘राष्ट्रकुल’मध्ये भारताने या खेळात ४९ सुवर्णांसह ११४ पदकांवर आपली मोहोर उमटवली आहे. व्हिक्टोरियातील स्पर्धेतून कुस्ती खेळाला वगळण्यात आल्यामुळे कुस्तीप्रेमींची निराशा होणार आहे.'या' खेळांचा समावेश२०२६ मधील स्पर्धेत या खेळांचा समावेश : ॲथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हीलचेअर बास्केटबॉल, बॉक्सिंग, बीच व्हॉलीबॉल, कोस्टल रोइंग, क्रिकेट टी २० (महिला), सायकलिंग (बीएमएक्स, माउंटन बाइक, रोड, ट्रॅक व पॅरा-ट्रॅक), डायव्हिंग, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, लॉन बॉल, नेटबॉल, रग्बी ७, नेमबाजी, स्क्वॉश, जलतरण, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, पॅरा-ट्रायथलॉन, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग.

जागतिक क्रीडाक्षेत्राचा कुस्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. कुस्तीला वगळण्याचा निर्णय योग्य नाही. अशा निर्णयामुळे मल्लांचे खच्चीकरण होणार आहे. त्यांच्यावर हा अन्यायच आहे. नवे खेळाडू या खेळाकडे कसे वळतील? कुस्ती नामशेष होण्याचा धोका आहे. याविरोधात देशभर उठाव झाला पाहिजे. - राम सारंग, राष्ट्रकुल पदक विजेते मल्ल आणि प्रशिक्षक, कोल्हापूर. 

कुस्ती हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा खेळ आहे. तो टिकला पाहिजे. कुस्तीला वगळणे निषेधार्ह आहे. या स्पर्धेतून पैलवान ऑलिम्पिक स्पर्धेची तयारी करतात. भारतीय पदकतालिकेत मोठी भर पडते. खेळाडूंना प्रोत्साहन मिळते. त्यामुळे कुस्तीचा समावेश पुन्हा व्हावा यासाठी आपल्या ऑलिम्पिक महासंघाने पाठपुरावा केला पाहिजे. - नरसिंग यादव, ‘अर्जुन’वीर, राष्ट्रकुल पदक विजेते मल्ल

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्ती