शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेचा विश्वविक्रम, सांगलीतील निर्धार फाऊंडेशनला इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डकडून प्रमाणपत्र

By अविनाश कोळी | Updated: February 20, 2024 19:21 IST

सांगली : सांगलीतील तरुणांच्या एका गटाने स्वच्छतेत मैलाचा दगड ठरावा अशी कामगिरी नोंदवित अखंडित २ हजाराहून अधिक दिवस अभियान ...

सांगली : सांगलीतील तरुणांच्या एका गटाने स्वच्छतेत मैलाचा दगड ठरावा अशी कामगिरी नोंदवित अखंडित २ हजाराहून अधिक दिवस अभियान राबविले. अजूनही त्यांचा हा स्वच्छतेचा प्रवास सुरुच आहे. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांची दखल इंडियाज् वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली होती. पाठोपाठ इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेनेही त्यांच्या गळ्यात विश्वविक्रमाची माळ घातली आहे.सांगलीच्या निर्धार फाऊंडेशनमार्फत दड्डणावर यांनी १ मे २०१८ रोजी स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. नागरिकांना सुरुवातीला ही औपचारिकता वाटली, पण शहरातील अनेक भागांचे रूपडे बदलू लागले तेव्हा अनेक तरुण, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी त्यांच्या अभियानात सहभागी झाले. अभियानाची व्यापकता वाढत गेली. सुरुवातीला शहरापुरती मर्यादित असणारी ही मोहीम शहरालगतच्या गावांमध्ये पोहचली. नंतर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरही तिचा डंका वाजला.आषाढी एकादशीनंतर पंढरपूरच्या मंदिर परिसरासह संपूर्ण घाट या फाऊंडेशनने चकाचक केला. त्यानंतर राज्यभरातील युवक या अभियानाशी जोडले गेले. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय दड्डणावर व त्यांच्या ग्रुपने गलिच्छ वस्त्यांना सुंदरतेचे वरदान दिले. १ मे २०१८ रोजी त्यांनी हाती घेतलेला झाडू आजही त्यांच्या हाती टिकलेला आहे. एक दिवसाचाही खंड न पाडता या तरुणांनी मोहीम राबविली. अभियानास २ हजार दिवस पूर्ण होताच इंडियाज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना प्रमाणपत्र दिले.

शहर, गावांचे रुपडे पालटलेदड्डणावर व त्यांच्या टीमने अस्वच्छ परिसर स्वच्छ केले, सेल्फी पॉईंट उभारले, बसस्थानके, दुभाजके, चाैक, स्मशानभूमी अशा अनेक ठिकाणांचे रूपडे त्यांनी पालटले. राजकीय नेत्यांसह परिसरातील बड्या अधिकाऱ्यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

टॅग्स :Sangliसांगली