शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

थकित व्यापाऱ्यांसाठी सांगली येथे 1 जून रोजी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 14:00 IST

जीएसटीची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी व्हॅट, व्यवसायकर, लक्झरी टॅक्स, केंद्रीय विक्रीकर व इतर कायद्यांखाली थकबाकी प्रलंबीत असलेल्या व्यापाऱ्यांना कर, व्याज व दंड यामध्ये सवलत देण्यासाठी राज्य सरकारने अभय योजना जाहीर केली आहे.

ठळक मुद्देथकित व्यापाऱ्यांसाठी सांगली येथे 1 जून रोजी कार्यशाळासवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन

सांगली : जीएसटीची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी व्हॅट, व्यवसायकर, लक्झरी टॅक्स, केंद्रीय विक्रीकर व इतर कायद्यांखाली थकबाकी प्रलंबीत असलेल्या व्यापाऱ्यांना कर, व्याज व दंड यामध्ये सवलत देण्यासाठी राज्य सरकारने अभय योजना जाहीर केली आहे.व्यापाऱ्यांना योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी वस्तु व सेवाकर भवन, चिंतामणीनगर, सांगली येथे दिनांक 1 जून 2019 रोजी दुपारी 4 ते 5.30 या वेळेत फक्त व्यापाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व थकबाकीदार व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यकर उपायुक्त शर्मिला मिस्किन यांनी केले आहे.30 जून 2017 पर्यंतच्या कालावधीच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना घोषीत करण्यात आली असून ही योजना 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019 आणि 1 जुलै 2019 ते 31 जुलै 2019 अशा दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकी जमा केल्यास विवादीत रकमेतून 50 टक्के सवलत मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तडजोड केल्यास थकीत रकमेतील 60 टक्के रक्कम भरावी लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात 10 टक्के व्याजाचा भरणा केल्यास 90 टक्के व्याज माफ होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 20 टक्के व्याजाची रक्कम भरून 80 टक्के व्याज माफ होईल. पहिल्या टप्प्यातील तडजोड योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 जूनपूर्वी थकीत रकमेचा भरणा व अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी 31 जुलैपूर्वी रक्कम भरणे आवश्यक आहे.

व्यापाऱ्यांनी पूर्वीच्या अभय योजनेचा लाभ घेतला असला तरी नवीन तडजोड योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी व्यापाऱ्यांनी मुदतीत अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अपिल दाखल केले असल्यास अपिल मागे घेवून अभय योजनेसाठी अर्ज करता येईल. तसेच सर्व व्यापाऱ्यांसाठी व्यवसायकराची, 'एकदाच करभरणा योजना 2019' अंमलात आणली आहे.थकबाकीदार व्यापाऱ्यांना थकबाकीविषयी सविस्तर माहिती नसेल किंवा तत्संबंधी दस्तएैवज उपलब्ध नसतील तर त्यांनी राज्यकर उपायुक्त कार्यालयाशी संपर्क साधून त्याविषयीची माहिती प्राप्त करून

टॅग्स :GSTजीएसटीSangliसांगली