सांगली : पुतळाबेन शाह महाविद्यालयात सीटीईटी, टीईटी आणि टीएआयटी परीक्षांविषयी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा झाली. शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. प्राचार्य डॉ. बी. पी. मरजे अध्यक्षस्थानी होते. यावेळी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे उपस्थित होते. राज्यभरातून १,२०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली. प्रा. अर्जुन सूरपल्ली यांनी मार्गदर्शन केले. विष्णू कांबळे यांच्या हस्ते गुणवत्ताधारकांचा सत्कार करण्यात आला. ऐश्वर्या तेरदाळे हिचा टीईटी उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच तंत्रस्नेही शिक्षिका म्हणून सत्कार करण्यात आला. स्वप्नप्रीती हारुगडे हिचा टीईटी परीक्षा सर्वाधिक गुणांसह उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्नेहा कदम, प्रतिभा मगदूम, संकेत नायकवडी, सुरज पाटील, कल्लाप्पा चौगुले, संगीता आवळे, तेजस्विनी माळी यांचाही सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. सुशील कुमार यांनी परीक्षा आणि दृष्टिकोन यासंदर्भात मार्गदर्शन केले. नेहा चिखले यांनी आभार मानले.
शाह महाविद्यालयात टीईटी परीक्षांविषयी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST