शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पूरपट्ट्यात साक्षी ग्रुप, मराठा क्रांतीचे काम उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 21:42 IST

विविध गावातील लोकांना विशेषत: दलित वस्तीत मोठ्या प्रमाणात मदतीची गरज होती. परंतु त्या वस्तीपर्यंत जाणेही जिकिरीचे होते. पाणी, चिखल तुडवत, जिवाची पर्वा न करता त्यांना मदत दिली जात होती.

ठळक मुद्दे नागरिकांना दिलासा : गीतरंग म्युझिक, चळवळीची आर्मी, शैक्षणिक साहित्य विक्रे ता आदी संघटनाही सरसावल्या

जितेंद्र येवले ।इस्लामपूर : कृष्णा व वारणा नद्यांना आलेल्या पूरपस्थितीच्या काळात प्रशासनाअगोदर पोहोचून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अत्यंत नियोजनबद्ध काम करणाऱ्या संस्था व चळवळी या कोणत्याही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता अव्याहतपणे काम करत आहेत. खरे तर सरकार व उच्चपदस्थांनी अशा संघटनांची दखल घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील साक्षी ग्रुप, मराठा क्रांती मोर्चा, गीतरंग म्युझिक, चळवळीची आर्मी, शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना यांचे पूरस्थितीवेळचे कामकाज अत्यंत नियोजनबध्द झाले. त्यांच्या कार्याला सलाम!

वाळवा तालुक्यात पूरपरिस्थिती गंभीर होती. आता पूर ओसरला असून सर्व गावात घाण व दुर्गंधी पसरली आहे. तालुक्यातील साक्षी ग्रुप, मराठा क्रांती मोर्चा, गीतरंग म्युझिक, चळवळीची आर्मी या सेवाभावी संस्था, संघटनांच्या माध्यमातून गावा-गावातून स्वच्छता मोहीम राबवणे सुरु आहे. तसेच पूरग्रस्तांना पूरस्थितीपासून जेवण, कपडे पोहोचवण्याचे काम आजही सुरु आहे.

विविध गावातील लोकांना विशेषत: दलित वस्तीत मोठ्या प्रमाणात मदतीची गरज होती. परंतु त्या वस्तीपर्यंत जाणेही जिकिरीचे होते. पाणी, चिखल तुडवत, जिवाची पर्वा न करता त्यांना मदत दिली जात होती. राष्ट्रीय महामार्गावर नद्यांचे पाणी आले होते. त्यावेळी क-हाड ते शिरोलीपर्यंत महामार्गावरील वाहतूक बंद होती. महामार्ग म्हणजे वाहनतळच बनले होते. येथे थांबलेल्या ट्रक व वाहनांतील लोकांना प्रत्यक्ष अन्न पुरवण्याचे कामही या संस्थांनी चोखपणे केले आहे.

साक्षी ग्रुप, मराठा क्रांती मोर्चा, गीतरंग म्युझिक, चळवळीची आर्मी, शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे सातारा, पाटण, महाबळेश्वर, पुणे, मुंबई व इतर ठिकाणाहून आलेल्या मदत साहित्याचे अत्यंत नियोजनबद्ध प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पूरबाधितांनाच वाटप केले. यामध्ये पॅकिंग केलेले खाद्यपदार्थ व वस्तू अत्यंत गरजवंतांनाच देण्यात आल्या.

आरोग्य शिबिरातून पूरग्रस्तांची मोफत तपासणीमहिला डॉक्टर व त्यांचे पथक ठिकठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन मोफत तपासणी तसेच औषध, साबण, टूथपेस्ट व इतर आरोग्यदायी वस्तू वाटत असून, महिला व मुलींच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन मोफत देत आहेत. दहा हजारपेक्षा जास्त सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आली आहेत. या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बहे, साटपेवाडी, मसुचीवाडी, पर्वतवाडी, वाळवा, बनेवाडी, डिग्रज, शिरगाव, ऐतवडे खुर्द, रेठरेहरणाक्ष, काखे यासह इतर गावात अत्यंत कृतिशील व नियोजनबद्ध मदत करण्यात आली.

 

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूर