शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींची ‘व्होट बँक’ राखण्यासाठी कसरत : अमृत योजनेचे राजकारण नव्या वळणावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 23:21 IST

इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र

ठळक मुद्देइचलकरंजी पाणी योजनेस विरोध टाळला

अशोक पाटील ।इस्लामपूर : इचलकरंजीतील अमृत योजनेसाठी वारणा नदीतून पाणी उचलण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी ‘इचलकरंजीला पाणी देताना वारणाकाठावर अन्याय होऊ देणार नाही’ असे वक्तव्य करुन शेतकºयांची ‘व्होट बँक’ शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजीला हे पाणी मिळणार असल्याने, त्यांनी योजनेला उघड विरोध करणे टाळले आहे.

वारणेचे पाणी इचलकरंजीला नेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ही योजना होऊ देणार नसल्याची भूमिका शेकापचे ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील, ढवळीचे माजी सरपंच शरद पाटील, वाळवा पंचायत समितीचे विरोधी गटनेते राहुल महाडिक, वारणा काठावरील गावांनी घेतली आहे. त्यासाठी पक्षविरहित वारणा बचाव कृती समिती स्थापन केली आहे.

राजू शेट्टी यांनी नुकताच वाळवा तालुक्यात दौरा केला. कणेगाव येथे शेतकºयांनी अमृत योजनेचा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी खा. शेट्टी यांनी स्वत:च्या मतपेढीचा विचार करून इचलकरंजीकरांना दुखवायचे नाही आणि वाळव्यातील शेतकºयांचा रोषही पत्करायचा नाही, या भूमिकेतून सामंजस्याने तोडगा काढू, असे आश्वासन देऊन शेतकऱ्यांची समजूत काढली व वेळ मारून नेली.

वारणा खोºयातील जिरायती जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. वसंतदादांनी चांदोली येथे धरण होण्यासाठी मोठे प्रयत्न केले. परंतु सांगली जिल्ह्यातील शेवटच्या दुष्काळी भागापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी खुजगाव येथे धरण व्हावे म्हणून राजारामबापूंनी आग्रह धरला होता. या दोघांचा वाद साºया महाराष्ट्राला ज्ञात होता. शेवटी वारणा नदीवर चांदोली येथे धरण झाले. त्या वादाचे पडसाद अजून उमटत आहेत. 

खा. राजू शेट्टी जनसामान्य आणि कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. एकीकडे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तर या योजनेमुळे शेतकºयांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळणार नाही. हे दोन्ही प्रश्न शेट्टी यांच्या जिव्हाळ्याचे बनले आहेत. त्यामुळे त्यांनी इचलकरंजी व वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे.- राहुल महाडिक, विरोधी गट नेते, वाळवा पंचायत समिती.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली