लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : तुंग (ता. मिरज) ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनाचा विचार करून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून केला जाईल. तुंगच्या जनतेने आपल्याला जबाबदारी दिली आहे, आता चांगले काम करा, असे आवाहन युवा नेते प्रतीक पाटील यांनी केले.
तुंग येथील ग्रामपंचायतीस भेटीवेळी ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच श्रीमती विमल सूर्यवंशी, उपसरपंच माणिक पाटील यांनी स्वागत केले. भास्कर पाटील, धनाजी पाटील, भगवान कदम, भगवान कोळी, रामभाऊ सावंत उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले की, जनतेत जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करावा. जयंत पाटील यांनी वाळवा तालुक्यातील गावापेक्षा मिरज तालुक्यातील या गावावर विशेष लक्ष दिले आहे.
यावेळी सुभाष कदम, जावेद जमादार, राजू खोत, दीपक यादव, पद्मजा नलवडे, चंदा कोळी उपस्थित होते.