जत : सांगली जिल्ह्यात महिला शिक्षिकांची संख्या मोठी असून, त्यांच्या प्रश्नासाठी महिला शिक्षक संघ बळकट करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष स्वाती शिंदे-पवार यांनी केले.
जत तालुका महिला शिक्षक संघातर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
प्रमुख पाहुण्या म्हणून सांगली जिल्हा महिला शिक्षक संघाच्या कार्याध्यक्ष शोभा शिंदे, सुप्रिया पाटील, सोनाली चव्हाण उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील महिला शिक्षकांना निवडणुकीची कामे न देणे, बदलीमध्ये सोयीच्या शाळा मिळणे, पदोन्नतीमध्ये प्राधान्य, अशी अनेक कामे पूर्ण करण्यासाठी महिला शिक्षक संघाच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे स्वाती शिंदे यांनी सांगुतले.
यावेळी मीनाक्षी शिंदे, सुनीता वसावे, अलका पवार, आशा हावळे, नूरजहाँन मुल्ला, शारदा रुगी, राजश्री मसळी, चलदेवी पुजारी, सावित्री व्हनुटगी, मंदा गडदे, आशा गोडसे, मुमताज नदाफ आदी उपस्थित होत्या. अश्विनी वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. रिहाना नदाफ, रमल जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. वनिता कोले यांनी सूत्रसंचालन केले. सुनीता जाधव यांनी आभार मानले.
फोटो-०८जत१