शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

आमदार साहेब..ओवाळणी नको जुनी पेन्शन द्या; रक्षाबंधन दिनी महिला शिक्षिकांचे अनोखे आंदोलन

By अशोक डोंबाळे | Updated: August 30, 2023 17:40 IST

आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडून शासनाकडे प्रयत्न करण्याचे आश्वासन

सांगली : जिल्ह्यातील महिला शिक्षिकांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करीत सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांना बुधवारी रक्षाबंधन दिनानिमित्त राखी बांधून ओवाळणी नको आमदार साहेब, जुनी पेन्शन लागू करा, अशी मागणी केली. गाडगीळ यांनीही बहिणींना सन्मानाची वागणूक देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जुनी पेन्शन लागू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन दिले.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेतर्फे 'जुन्या पेन्शनसाठी राखी' या उपक्रम अंतर्गत सांगली जिल्हा महिला कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी रक्षाबंधनानिमित्त सुधीर गाडगीळ यांना राखी बांधून ओवाळणी नको, राज्यातील दि. १ नोव्हेंबर २००५ रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून, लाखो शिक्षक, शासकीय कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करावे, अशी मागणी केली.या उपक्रमात महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटन महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार, सरचिटणीस नूतन परिट, मिरज तालुका महिला संघटक शीतल भोसले, प्रीती कांबळे, सविता जाधव, त्रिशाला पडघन, सरिता पाटील, शुभांगी पाटील, योगिता अथनीकर, स्वाती चौगुले, माया गायकवाड, स्नेहा मंडल, उषा पवार, विद्या मोरे सहभागी होत्या. आमदार गाडगीळ यांनीही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तुमचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्र्यांना टपालाद्वारे पाठविल्या राख्यामहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्व महिला शिक्षिका आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी टपालाद्वारे राख्या पाठवून जुनी पेन्शन योजना लागू करून भविष्य सुरक्षित करण्याची मागणी केली आहे, अशी माहिती जुनी पेन्शन संघटन महिला आघाडी प्रमुख जयश्री कुंभार यांनी दिली.

टॅग्स :SangliसांगलीPensionनिवृत्ती वेतनRaksha Bandhanरक्षाबंधन