शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मगरीच्या हल्ल्यात महिला जखमी

By admin | Updated: October 3, 2016 00:22 IST

सुखवाडीतील घटना : घागरीमुळे सुटका; वन विभागाचे दुर्लक्ष

भिलवडी : सुखवाडी (ता. पलूस) येथील सौ. कल्पना जालिंदर कदम (वय ४७) या महिलेवर मगरीने हल्ला केला. मात्र हातातील भांडे मगरीच्या तोंडात अडकल्याने मगरीच्या तावडीतून या महिलेची सुटका झाली. ही घटना शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडली. मात्र या प्रकरणाची वाच्यता कोठेही होऊ नये म्हणून वन विभागानेच सुखवाडीतील नागरिकांवर दबाव टाकला असल्याची चर्चा सर्व परिसरात होत आहे. सुखवाडी येथील महिला कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर धुणे धुणाऱ्या महिलांची मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या या मगरीच्या हल्ल्यामुळे पाणवठ्यावरील सर्व महिला भीतीने पळू लागल्या. कल्पना कदम यांच्या हातातील भांडे मगरीच्या जबड्यात अडकल्याने त्यांची यातून सुटका झाली व मगर परत पाण्यात गायब झाली. या प्रकारानंतर सुखवाडीच्या नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधला, मात्र उशिरापर्यंत याची दखल घेतली नाही. (वार्ताहर) डाव्या हाताचा चावा कल्पना यांच्या शेजारी धुणे धुणाऱ्या सोनाली अर्जुन जाधव या युवतीस पाण्यामध्ये हालचाल जाणविल्याने ती पाण्याबाहेर आली. याचवेळी पाण्यात भांडे धुत असणाऱ्या कल्पना कदम यांच्यावर मगरीने हल्ला चढवून त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला.