शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कासेगावात दारूबंदीसाठी नारीशक्ती सरसावली

By admin | Updated: August 29, 2014 23:11 IST

पडद्यामागून हालचाली : दारूबंदीच्या ठरावासाठी सरपंचांना निवेदन

प्रताप बडेकर - कासेगाव -कासेगाव (ता. वाळवा) येथील कायमची दारूबंदी करण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. दारूबंदीचा ठराव घ्यावा याकरिता शेकडो महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन सरपंच नंदाताई पाटील यांना देण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, तर विरोधी गट पडद्यामागून वेगवान हालचाली करत आहे.कासेगाव येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दारूबंदीसाठी प्रत्येक ग्रामसभेमध्ये विरोधी गटाकडून आवाज उठवला जात आहे. परंतु आजअखेर यावर सत्ताधारी गटाकडून फक्त आश्वासने दिली जात असल्याची तक्रार विरोधी गटाकडून केली जात आहे.गेल्यावर्षी ग्रामसभेत दारूबंदीबाबत ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील यांनी सत्ताधारी गटाचे सचिन पाटील व विरोधी गटाचे पांडुरंग वाघमोडे यांना यामध्ये लक्ष घालावयाच्या सूचना केल्या होत्या. परंतु विरोधी गटाकडून कुणीही आमच्याशी चर्चा केली नसल्याची तक्रार सरपंच नंदाताई पाटील व सचिन पाटील यांनी केली आहे, तर दारूबंदीच्या ठरावाबाबत जाणून-बुजून सत्ताधारीच असमर्थता दाखवत असल्याचा थेट आरोप विरोधी गटाकडून होत आहे. स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या ग्रामसभेतही या प्रश्नावर विरोधी गटाकडून आवाज उठवण्यात आला होता व दारूबंदीचा ठराव घ्या, अशी मागणी केली होती. परंतु सरपंचांनी त्याबाबत असमर्थता दर्शवत महिला जर यामध्ये सहभागी होत असतील व त्यांच्याकडून याबाबत निवेदन आले, तर त्याबाबत विचार करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती.या संधीचा फायदा घेत विरोधी गटातील पांडुरंग वाघमोडे, भीकशेठ तोडकर, शंकर बागल, विजय पाटील, जयप्रकाश रणदिवे, तानाजी गावडे, भीमराव माळी, जयदीप पाटील, सुरेश माने, राजेंद्र कराडे, दिनकर जाधव आदींनी महिलांच्या स्वाक्षरीचे दारूबंदीबाबत ठराव घ्यावा, अशा आशयाचे निवेदन सरपंचांना दिले आहे. त्यामुळे दारू बंदीबाबतच्या ठरावाचा चेंडू पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात आला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी कोणती भूमिका घेतात, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.सरपंचांनीच पुढाकार घ्यावासरपंच नंदाताई पाटील यांनीच या दारूबंदीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामसभेमध्ये विरोधी गटाकडून सातत्याने दारूबंदीसाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्याला सत्ताधाऱ्यांची साथ लाभत नसल्यानेच गावातील दारूबंदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे सौ. पाटील यांनीच यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.