शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ॲट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्या, गावाची बदनामी थांबवा; सांगलीत बेडग ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By संतोष भिसे | Updated: July 24, 2023 16:23 IST

बेडगसह पंचक्रोशीत कडकडीत बंद

सांगली : बेडग (ता. मिरज) येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर पोलिसांनी अनुसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ॲट्रॉसिटी) गुन्हे दाखल केल्याने हजारो ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. गुन्हे मागे घेण्याची व गावाची बदनामी थांबविण्याची मागणी केली. पंधरवड्यात गुन्हे मागे घेतले नाही, तर मुंबईला लॉंंग मार्च काढण्याचा इशारा दिला.बेडग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची स्वागत कमान पाडल्यानंतर आंबेडकरी समाजाने मुंबईला लॉंग मार्च काढला होता. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेडग ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. ग्रामिण पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानंतर गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली. ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कारवाईचा निषेध केला. सकाळी १० वाजता गावातून हजारो स्त्री-पुरुष आंदोलक भगवे झेंडे हातात घेऊन निघाले. हजारो भगव्या झेंड्यांमुळे मिरज-सांगली रस्ता भगवामय झाला होता. अनुचित प्रकार टाळण्यासाठी बेडगपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दुपारी साडेबाराच्या सुमारास आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. तेथे सभेत रुपांतर झाले. विविध नेत्यांनी भूमिका मांडत सरकारने अन्याय केल्याचे सांगितले. सरपंचांसह पदाधिकाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक आणि एकतर्फी असल्याने ते मागे घेण्याची आमची मागणी आहे.शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चाग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन चर्चा केली. राजकीय दबावाखाली दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.बेडगसह पंचक्रोशीत कडकडीत बंददरम्यान, आज बेडग गावासह पंचक्रोशीतील आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी आदी गावांनी बंद पाळला. बेडग ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या गावांतून मोठ्या संख्येने ग्रामस्थ मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

टॅग्स :Sangliसांगली