शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

टोल रद्दचे आश्वासन आता पाळणार का?

By admin | Updated: November 5, 2014 23:44 IST

जयंत पाटील : नव्या सरकारपुढे आव्हाने

इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीवेळी भाजपने एलबीटी आणि टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. ते आव्हान त्यांना पेलावे लागेल. नवीन मुख्यमंत्री अभ्यासू अन् उत्साही आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर टोकाचे आरोप केले. मात्र राज्य कारभार करताना काय अडचणी येतात, याची जाणीव त्यांना लवकरच येईल. स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीने बाहेरुन पाठिंबा दिला आहे. विधानसभेत १0 तारखेला कोण कुठे बसेल हे स्पष्ट होईल, असे प्रतिपादन माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.शहरातील रस्ते विकास प्रकल्पाच्या कामाची सुरुवात करताना शिराळा नाका येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे अध्यक्षस्थानी होते. यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटीचा निधी मिळाला आहे. हा निधी मिळविण्यासाठी अथक् परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.आमदार जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकीत शहरातील रस्ते चांगल्या दर्जाचे व टिकाऊ पध्दतीने करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या परिपूर्तीसाठी प्रयत्न म्हणून रस्ते विकासाची कामे सुरु होत आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सुविधा देण्याचाही प्रयत्न आहे. त्यामुळे शहरासह वाळवा तालुक्याला राज्यातील सर्व सुविधांनीयुक्त अग्रेसर परिसर बनवू. रस्त्यांच्या दर्जाबाबत स्थानिक सत्ताधाऱ्यांनी दक्ष रहावे.माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी, उद्यानाचे शहर म्हणून नवीन ओळख धारण करणाऱ्या इस्लामपूरमधील रस्ते उत्तम दर्जाचे असायला हवेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील म्हणाले की, जयंत पाटील यांनी एवढा निधी देऊन ठेवला आहे की, पाच वर्षे तो संपणार नाही. यावेळी शहाजी पाटील, खंडेराव जाधव, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, सौ. अरुणादेवी पाटील, विलास भिंगार्डे यांची भाषणे झाली.माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे यांनी प्रास्ताविक, बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेविका सौ. कविता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास पालिकेतील पदाधिकाऱ्यांसह, नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधीइस्लामपूर शहरातील रस्त्यांसाठी अडीच कोटींचा निधी मिळाला आहे. यातूनच रस्त्यांच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते यल्लम्मा चौक, आष्टा नाका व शिराळा नाका येथे रस्ते विकास कामाचे उद्घाटन झाले. हा निधी मिळविण्यासाठी अथक परिश्रम घेतल्याबद्दल मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाच्या पूर्तीचा एक भाग म्हणून रस्ते कामास प्रारंभ होत आहे.