शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

एक किलो सोने घेऊन पत्नीचा पोबारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 23:52 IST

इस्लामपूर : शहराच्या संभाजी चौकातील खराडे गल्लीत असणाऱ्या घरातून महिलेने आई, मामा व इतर नातेवाईकांच्या साथीने पतीच्या घरातून ३३ ...

इस्लामपूर : शहराच्या संभाजी चौकातील खराडे गल्लीत असणाऱ्या घरातून महिलेने आई, मामा व इतर नातेवाईकांच्या साथीने पतीच्या घरातून ३३ लाख रुपयांच्या १ किलो १00 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. चोरीची ही घटना १८ नोव्हेंबर २0१८ रोजी घडली, मात्र त्याबाबत शुक्रवारी पतीच्या वागण्यावर संशय घेऊन पत्नीने हे चौर्यकर्म करत पोबारा केला आहे.याबाबत पती जितेंद्र ज्ञानदेव परदेशी (वय ५१, रा. संभाजी चौक) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली. मुलींच्या शिक्षणावर आणि जगण्यावर परिणाम व्हायला नको, या भीतीने त्यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र समजूतदारपणे सांगूनही चोरी केलेले सोने परत मिळणार नसल्याची खात्री झाल्याने, अखेर परदेशी यांनी पोलिसांत धाव घेतली.जितेंद्र परदेशी यांची पत्नी पूजा जितेंद्र परदेशी (रा. तळेगाव दाभाडे, पुणे), तिचा मामा गणेश शंकर भोई (वाळवा), रुक्मिणी परदेशी, कल्पना रवींद्र परदेशी, दीपक वासुदेव भोई, महेश हरिश्चंद्र परदेशी, मंगल हरिश्चंद्र परदेशी (सर्व रा. तळेगाव, दाभाडे, पुणे), देवेंद्र वासुदेव भोई (रा. भोई गल्ली वाळवा) अशा आठ जणांविरुध्द पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंद केला आहे.जितेंद्र व पूजा यांचा २१ वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी फिलिपाईन्स देशात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. जितेंद्र यांचे बिअर शॉपी, मंगल कार्यालय, व्हिडीओ गेम पार्लर आणि शेती असे व्यवसाय आहेत. या सर्व व्यवसापासून मिळणाºया उत्पन्नातून त्यांनी १ किलो १00 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करून घरी ठेवले होते. गेल्या चार वर्षांपासून पत्नी पूजा ही जितेंद्र यांच्यावर बाहेरख्यालीपणाचा आरोप करून वाद घालत होती. अनेकवेळा समजूत काढूनदेखील पूजाच्या वागण्यात बदल झाला नाही. नोव्हेंबर १७ मध्ये हा वाद मिटविण्यासाठी पत्नीचे नातेवाईक घरी आले होते. त्यावेळी धंद्यातील गुंतवणूक आणि फ्लॅट घेण्यासाठी घरामध्ये ठेवलेली ९ लाख ६८ हजार रुपयांची रोकड गायब झाली होती. चौकशी करून पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर मेहुणी गायत्री परदेशी हिने तिच्या पिशवीत ठेवलेली रक्कम काढून दिली होती.यादरम्यान पत्नी पूजा ही जितेंद्र यांच्या घरामध्येच विभक्त राहत होती. त्यावेळीही तिचा वाद सुरूच होता. १८ नोव्हेंबर २0१८ रोजी वरील सर्व संशयित भांडण मिटविण्यासाठी घरी आले. यावेळी मामा गणेश भोई याने भांडण मिटविण्याऐवजी अपशब्द वापरून वाद वाढवत ठेवला. हे भांडण वाढू नये यासाठी जितेंद्र परदेशी काही काळ घराबाहेर पडले. या संधीचा फायदा घेत पत्नी पूजाने मामाच्या सोबतीने घरातील बेडरुममधील स्वत:चे कपडे बॅगमध्ये भरतानाच सोन्याच्या दागिन्यांचा डबाही चोरला. ही घटना मुलींनी पाहिली होती. त्यानंतर जितेंद्र यांनी समजूतदारपणे चोरलेले दागिने परत देतील, या विचाराने फिर्याद दिली नव्हती. मात्र पूजाच्या मामाने जितेंद्र यांना मारहाण करून, ‘तुझे सोने आम्ही विकले आहे. तुला काय करायचे ते कर. तसेच गुंडांना सुपारी देऊन तुझी गेम करू’, अशी धमकी दिली. त्यामुळे जितेंद्र परदेशी यांनी फिर्याद दिली.चोरीस गेलेला मुद्देमाल असा...चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांत मंगळसूत्र, मिनी टॉप्स, ५ तोळे वजनाची ५ बिस्किटे, पेंडंट, तोडे, बांगड्या, पाटल्या, पानवेल, अंगठ्या, राणीहार अशा एकूण १ किलो १00 ग्रॅम दागिन्यांचा समावेश आहे.