शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत विधवा महिलांनी केले वडपूजन, सुवासिनींकडूनही मिळाला कुंकवाचा मान

By अविनाश कोळी | Updated: June 21, 2024 16:31 IST

सांगली : वटपौर्णिमेचे नाते परंपरेने सुवासिनींशी जोडले आहे. मात्र, परंपरेच्या या धाग्यात विधवा महिलांनाही गुंफत त्यांनाही वडपूजनाचा व हळदी-कुंकूचा ...

सांगली : वटपौर्णिमेचे नाते परंपरेने सुवासिनींशी जोडले आहे. मात्र, परंपरेच्या या धाग्यात विधवा महिलांनाही गुंफत त्यांनाही वडपूजनाचा व हळदी-कुंकूचा मान देण्याचा उपक्रम सांगलीत राबविण्यात आला. सुवासिनींनीही विधवा महिलांना सन्मान देत त्यांच्या कृतीचा आदर केला.सांगलीच्या सितारामनगरमध्ये एका उद्यानात हा अनोखा कार्यक्रम पार पडला. येथील सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पत्की यांनी विधवा महिलांचे संघटन करुन ‘सुवासिनी’ नावाचा ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून विधवा महिलांना समाजात सन्मान प्राप्त करुन देण्याची चळवळ राबविली जाते. यापूर्वीही संक्रांतीच्या सणावेळी हळदी-कुंकू व वाण देऊन विधवा महिलांना मान-पानाचा गोडवा दिला होता.वटपोर्णिमेच्या निमित्ताने प्रथमच विधवा महिलांना वडपूजनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. शहरातील सुमारे ५०० विधवा महिलांना निमंत्रण देण्यात आले होते. परंपरेचे बंध तोडत सणाच्या मानाचा धागा हाती घेण्यासाठी २५ महिला जमल्या. त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता वडाच्या झाडाचे पूजन केले. याठिकाणी जमलेल्या सुवासिनींनीही त्यांचे स्वागत करीत त्यांना हळदी-कुंकूचा मान दिला. त्यांच्या कृतीचा आदर केला. त्यामुळे विधवा महिला या उपक्रमाने भारावून गेल्या. सुवासिनींइतकाच मान त्यांना देण्यात आला. कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र घालून सुवासिनींप्रमाणे विधवा महिलांनी सहभाग नोंदविला.

वडाच्या झाडाला समानतेचे दोरऑक्सिजनचा मोठा स्रोत म्हणून वडाच्या झाडाकडे पाहिले जाते. ऑक्सिजन देताना हे झाड कधी भेदभाव करीत नाही. मग, माणसांनीच महिलांमध्ये भेदाच्या भिंती उभ्या केल्या. त्या भींती तोडण्यासाठी व वटवृक्षाच्या नियमाप्रमाणे समानतेचे दोर बळकट करण्यासाठी उपक्रम राबविल्याचे आयोजक अस्मिता पत्की यांनी सांगितले.

तीन वर्षांपूर्वी कोरानाने माझ्या पतीचा मृत्यू झाला. विधवा महिलेचे दु:ख मी जाणते. सण, परंपरेत विधवांना मान मिळत नसल्याने महिलांचे खच्चीकरण होते. अशा खचलेल्या सर्व महिलांसाठी आशेची नवी खिडकी खोलावी म्हणून एक चळवळ उभी केली. वटपोर्णिमेला विधवा महिलांच्या या कृतीचे सुवासिनींनी स्वागत केल्याने आम्ही आनंदी आहोत. - अस्मिता पत्की, अध्यक्षा, सुवासिनी ग्रुप, सांगली

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिला