शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शालेय पोषण आहारातील चोरीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?

By अशोक डोंबाळे | Updated: March 29, 2023 16:46 IST

विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदूळ, कडधान्याची चोरी करून काही वाहतूकदार, ठेकेदार गलेलठ्ठ झाले आहेत

सांगली : जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील तांदूळ, कडधान्याची चोरी करून काही वाहतूकदार, ठेकेदार गलेलठ्ठ झाले आहेत. या चोरीबद्दल पुराव्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. तरीही ठेकेदार, पुरवठादारांवर कारवाई झाली नसल्यामुळे पोषण आहारातील चोरी आणखी वाढली आहे, असा आरोप स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केला आहे.

फराटे यांनी निवेदनात म्हटले की, जिल्ह्यासाठी पोषण आहार पुरवठ्याचा ठेका तासगाव तालुक्यातील एकाकडे आहे. ठेकेदार एका ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार पुरवठा करत आहे. यामध्ये ४० वाहने वज्रचौडे व आसपासच्या गावातील आहेत. ट्रान्स्पोर्टशी करार झालेला आहे. सदर टेम्पोमधून शाळांना पोषण आहार पुरवठा होत आहे. यामध्ये गहू, तांदूळ, हरभरा, मूगडाळ, तुरडाळ, मटकी, भगवती आदींचा समावेश आहे. सदर पुरवठा करताना वाहनांचे चालक पाइप मारून पोत्यातून पोषण आहाराची चोरी करत आहेत. शाळेत मुख्याध्यापक एकाच पोत्याचे वजन तपासून माल बरोबर असल्याचा सही-शिक्का करून देत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सर्व माल वजन करून घेतल्यास ठेकेदाराची चोरी उघडकीस येणार आहे. पण, मुख्याध्यापकांकडून तसे होत नसल्याचा ठेकेदार व पुरवठादार गैरफायदा घेत आहेत. पोत्यातून काढलेला माल वाहतूकदार तासगाव तालुक्यातील बलगवडे आणि वायफळेजवळील गोडावूनमध्ये ठेवत आहेत. तेथून दोन खरेदीदार पोषण आहारातून चोरलेला माल कमी दराने खरेदी करून जादा दराने विक्री करत आहेत. आतापर्यंत या वाहतूकदारांनी दहा टन माल परस्पर विक्री केला आहे. जिल्हा परिषदेच्या काही अधिकाऱ्यांचा यात सहभाग असून त्यांनाही महिन्याला ठेकेदार हप्ते देत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे....अशी होते चोरी

वाहनांचे चालक पाइप मारून पोत्यातून गहू, तांदूळ, हरभरा, मूगडाळ, तुरडाळ, मटकी, भगवती बाजूला काढत आहेत. हा चोरीचा माल पुन्हा तासगाव तालुक्यातील बलगवडे व वायफळेजवळ एका खासगी गोडावूनमध्ये ठेवून त्याची विक्री होत आहे.बोगसगिरी करणाऱ्याचा ठेका रद्द करा

एका बाजूला शाळेत तांदूळ नसल्यामुळे मुले पोषण आहारापासून वंचित आहेत. दुसऱ्या बाजूला पोषण आहारातील तांदूळ आणि कडधान्याची चोरी वाहतूकदारांकडून होत आहे. या प्रकरणास संबंधीत ठेकेदार जबाबदार असल्यामुळे त्याचा परवाना रद्द करावा, अशी मागणी फराटे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली