शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बलिदान मासमध्ये विद्यार्थ्यांना चप्पल घालण्याची सक्ती का?

By संतोष भिसे | Updated: March 16, 2025 15:05 IST

बलिदान मास सुरू असताना विद्यार्थ्यांना चप्पल, बूट घालण्याची सक्ती का करता? असा जाब विचारणारी झुंडशाही सांगलीत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये घडली.

सांगली : बलिदान मास सुरू असताना विद्यार्थ्यांना चप्पल, बूट घालण्याची सक्ती का करता? असा जाब विचारणारी झुंडशाही सांगलीत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये घडली. १५ ते २० कार्यकर्त्यांनी शाळेत मुख्याध्यापिकेच्या दालनात घुसखोरी केली. त्यांना दमदाटी केली. या झुंडशाहीला जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय पुरोगामी कार्यकर्त्यांच्या बैठकीत झाला.

शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. काही समाजकंटकांनी शाळेत घुसून दंगा केला. मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांनी रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य ॲड. अजित सूर्यवंशी यांना तात्काळ याची माहिती दिली. ॲड. सूर्यवंशी शाळेत गेले असता समाजकंटकांनी त्यांनाही जाब विचारून दंगा घातला. तुम्ही विद्यार्थ्यांना बूट आणि टोपी घालण्यास सक्ती का करता? याचा जाब द्या, असे धमकावले. विद्यार्थ्यांना प्रांगणात एकत्र करुन जबरदस्तीने प्रार्थनाही घेतली. ॲड. सूर्यवंशी यांच्या अंगावर ते धावूनही गेले.

या घटनेसंदर्भात शाळेतर्फे पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि पोलिस उपाधीक्षकांकडे तक्रार अर्ज देण्यात आला. दरम्यान, या गुंडगिरी व झुंडशाही प्रवृत्तीच्या विरोधात रविवारी कामगार भवनमध्ये पुरोगामी पक्ष आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी या घटनेचा निषेध करण्यात आला. अशा प्रवृत्तींच्या बंदोबस्तासाठी कृती कार्यक्रम ठरवण्यात आला.

बैठकीला उमेश देशमुख, जयवंत सावंत, जगदीश काबरे, अंनिसचे राहुल थोरात, सुनील भिंगे, मुख्याध्यापिका शुभांगी जगताप, प्रतापसिंह मोहिते -पाटील, सुदर्शन चोरगे, संदीप कांबळे, प्रवीण कोकरे, रोहित शिंदे, अभिजित पोरे, अक्षय सुनके, मारुती शिरतोडे, हिंमतराव मलमे, जनार्दन गोंधळी, तानाजी पाटील, तुळशीराम गळवे, राजवर्धन जाधव आदी उपस्थित होते.

असा करणार प्रतिकार

सोमवारी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देणार, विधानसभा आणि विधान परिषदेत चर्चा घडवून आणण्यासाठी आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित करावा यासाठी त्यांना पत्र देणार, सांगलीत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर सरोजमाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करणार, कामगार भवनमध्ये संभाजी महाराजांविषयी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करणार.

टॅग्स :Sangliसांगली