शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरज मतदारसंघात नगरसेवकांचे बळ कोणाच्या पदरात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 10:36 IST

सांगली व मिरज या दोन मतदारसंघात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा ज्वर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आणखी स्पष्ट होईल.

ठळक मुद्देसांगली, मिरज मतदारसंघात नगरसेवकांचे बळ कोणाच्या पदरात?महापालिकेत भाजपचे ४३, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक

शीतल पाटीलसांगली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सांगलीमिरज या दोन मतदारसंघात महापालिका नगरसेवकांची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली आहे. पाच वर्षात अनेक नगरसेवकांनी पक्ष, निष्ठा बदलल्या आहेत. त्यांच्या टोप्या व गळ्यातील पट्ट्यांचे रंगही बदलले आहेत. त्यात पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे, तर काहींनी छुपी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. प्रचाराचा ज्वर चढल्यानंतर नगरसेवकांची भूमिका आणखी स्पष्ट होईल.महापालिका क्षेत्र दोन विधानसभा मतदारसंघात विभागले गेले आहे. त्यामुळे विधानसभेची हद्द बदलल्यानंतर सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी सोयीची भूमिका घेतली आहे. महापालिकेत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत. सत्ता भाजपची असून त्यांचे ४३ नगरसेवक आहेत, तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ३५ नगरसेवक आहेत.

गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपकडून विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ निवडणुकीत आहेत. पण भाजपच्या नगरसेवकांतही सारे काही आलबेल नाही. माजी आमदार दिनकर पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविल्याने त्यांच्या समर्थक नगरसेवकांची भूमिका काय राहणार, हे महत्त्वाचे आहे. त्यात स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीवरून भाजपअंतर्गत नाराजी उफाळून आली आहे. इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने तेही नाराज आहेत. त्यामुळे हे नाराज नगरसेवक भाजपला हात दाखविण्याचे संकेत आहेत.काँग्रेस व राष्ट्रवादीची महापालिका निवडणुकीतही त्यांची आघाडी होती. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांत गतवेळच्या तुलनेत चांगला समन्वय आहे. महापालिकेत मदन पाटील व विशाल पाटील यांचा गट आहे. राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आदेश अंतिम असतो.

गेल्यावेळी राष्ट्रवादीने भाजपच्या आ. गाडगीळ यांना छुपी मदत केली होती. यंदा मात्र आघाडीचा धर्म पाळला जाणार असल्याचे नगरसेवकांकडून सांगितले जात आहे. पण त्यातही काही नगरसेवकांचा भाजप नेत्यांशी घरोबा आहे. महापालिका निवडणुकीत भाजप नेत्यांनी मदत केल्याचे बोलले जाते. त्याचा पैरा ते फेडणार असल्याचीही चर्चा रंगली आहे.मिरजेत सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांना भाजपचे नगरसेवक आनंदा देवमाने यांनी आव्हान देण्याची तयारी चालविली आहे. त्यांना भाजप नगरसेवकांची साथ मिळणार का? हाही प्रश्न आहे. त्यात खाडे यांचे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे कोण कोणाला मदत करतो, याचीच उत्सुकता आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बळ कोणाच्या पारड्यात पडणार, हे प्रचाराच्या रणधुमाळीवेळी स्पष्ट होईल.

टॅग्स :sangli-acसांगलीMuncipal Corporationनगर पालिकाmiraj-acमिरज