शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

‘काँग्रेसयुक्त भाजप’मध्ये कोण कोणाचा पैरा फेडणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:39 IST

श्रीनिवास नागे एकीकडं गटबाजी आणि लाथाळ्या, तर दुसरीकडं पक्ष सोडून चाललेले नेते आणि पराभूत मानसिकता यामुळं जिल्ह्यातली काँग्रेस-राष्टÑवादी पक्षांची ...

श्रीनिवास नागेएकीकडं गटबाजी आणि लाथाळ्या, तर दुसरीकडं पक्ष सोडून चाललेले नेते आणि पराभूत मानसिकता यामुळं जिल्ह्यातली काँग्रेस-राष्टÑवादी पक्षांची आघाडी आणखी गटांगळ्या खातेय. सोमवारी शिराळ्याच्या सत्यजित देशमुखांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपचं कमळ हातात घेतलं.अलीकडं राजकारणात ध्रुवीकरणाची संकल्पना खोलवर रूजत असताना सत्तेच्या पटावरची भाजपची पकड घट्ट होत चाललीय. खरं तर सांगली जिल्ह्यात पाच वर्षांपूर्वीच राजकीय समीकरणं बदलली. काँग्रेस-राष्टÑवादीच्या बड्या नेत्यांनी भाजपच्या तंबूची वाट धरली. पाच वर्षांत ही वाट बहुपदरी राजमार्ग बनली. महत्त्वाच्या सत्ताकेंद्रांमध्ये कमळ फुललं. गटबाजीनं पोखरलेल्या आणि लाथाळ्यांनी जर्जर झालेल्या काँग्रेस-राष्टÑवादी पक्षांच्या पदरी मग सततचा पराभव येणारच होता. तसंच झालं. पण दोन्ही पक्षांनी गटबाजीचा हेका सोडला नाही! शिराळ्यातले दिवंगत ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित यांच्यासारखे चेहरे लठ्ठालठ्ठीच्या झळांनी जास्त पोळले गेले.तिथले आमदार, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक आणि विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्यात १९९५ पासून दुरावा आला. त्यावेळी काँग्रेसमधून बाहेर पडून नाईक यांनी अपक्ष म्हणून झेंडा लावला आणि भाजप-सेना युतीला जवळ केलं. राज्यमंत्री झाले. पाच-सहा वर्षांनी राष्टÑवादीची वाट धरली. तिथं शेजारच्या वाळवा तालुक्यातल्या जयंतराव पाटील यांच्याशी बिनसल्यानं काँग्रेसमध्ये परतले... पुन्हा देशमुख गटाशी हातघाई सुरू झाली. त्यावेळी सत्यजित देशमुखांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले होते. त्यातच राष्टÑवादीत मानसिंगराव नाईक यांच्या रूपानं पुढं आलेल्या तिसऱ्या गटाला जयंतरावांनी पद्धतशीर रसद पुरवली. काँग्रेस-राष्टÑवादीतले हे तिन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यातले दोघे एकत्र आले की, तिसºयाचा पराभव ठरलेला, हे समीकरण आतापर्यंत चालत आलेलं...जिल्ह्यात आधीच काँग्रेस-राष्टÑवादीची भांडणं, त्यात काँग्रेसमधल्या वसंतदादा आणि कदम गटाचा संघर्ष टोकदार बनलेला. त्यामुळं शिराळ्याचा प्रश्न लटकला. मुत्सद्दी शिवाजीराव नाईकांनी पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये जाऊन तिकीट घेतलं. तिन्ही गट एकमेकांविरोधात उभे ठाकले आणि नाईक आमदार झाले...तिन्ही गट तोडीस तोड, पण संस्थात्मक पातळीवर मानसिंगरावांची बाजू जरा उजवी. त्यांच्याकडच्या सहकारी आणि खासगी संस्थांचा पसारा मोठा. त्या सगळ्या सक्षम, आर्थिकदृष्ट्या भक्कम. त्या पाठबळावर त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा उचल खाल्लीय. मात्र शिवाजीराव नाईक आणि सत्यजित देशमुख यांच्याकडं तुलनेनं संस्था कमी. देशमुखांचा साखर कारखाना चालवण्यास दिलेला, तर आमदार नाईकांच्या संस्था अडचणीत आल्यात. देशमुखांकडं शिक्षण संस्थेचं बळ मात्र दिसतंय.विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येताच तिन्ही गटांच्या हालचाली वाढल्या. निवडणुकीच्या राजकारणात तिन्ही गटांची एकमेकांना कधी-ना-कधी मदत झालेली. त्यामुळं आता कुणी कुणाचा पैरा फेडायचा, कुणी थांबायचं याचा घोळ वाढतच चाललेला.काँग्रेस-राष्टÑवादीची आघाडी असली तरी आणि जयंतराव पाटील हे सत्यजित देशमुखांचे साडू असले तरी त्यांचा ओढा मानसिंगरावांकडंच जादा. काँग्रेसला दाबण्याची संधी ते कशी दवडतील! ते मानसिंगरावांचंच नाव पुढं करणार, हे सूर्यप्रकाशाइतकं लख्ख होतं.दुसरीकडं जिल्ह्यातल्या काँग्रेसला खमक्या नेताच नसल्यामुळं सगळे नेते केवळ आपापले गट शाबूत ठेवण्यात मग्न आणि कार्यकर्ते सैरभैर. त्यामुळं पक्षनिष्ठेच्या कचकडी दुनियेत किती काळ रहायचं, असा सवाल सत्यजित देशमुखांना पडला. याचवेळी ‘इनकमिंग मास्टर’ असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ते हेरलं आणि गळ टाकला. उमेदवारीची भाकरी फिरवण्याचीही चर्चा झाली. देशमुख घराण्याची पन्नास-पंचावन्न वर्षांची काँग्रेसवरची निष्ठा ढळली... देशमुख राजी झाले. भाजपमधले दावेदार वाढले.हे एवढ्यावरच थांबलं, तर राजकारणं कसलं! पेठनाक्यावरच्या सम्राट महाडिकांनीही उमेदवारीवर दावा केलाय. कधीकाळी काँग्रेसचा हात हातात असणाºया महाडिक गटानं पक्षातल्या गटबाजीला कंटाळून आणि जयंतरावांना विरोध म्हणूूनच भाजपशी जवळीक साधलीय. आतापर्यंत ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्वांना आम्ही मदत केली. यावेळी त्यांनी आम्हाला करावी, हे महाडिकांचं तर्कसंगत आवाहन! आता हा पैरा कसा फिटणार..?जाता-जाता : शिराळ्यात भाजपमधून शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक हे तिघे प्रबळ दावेदार. नवा चेहरा म्हणून देशमुखांना उमेदवारी द्यावी तर विद्यमान आमदार नाईक यांचा गट थांबणार का, नाईकांनाच पुन्हा चाल द्यावी तर देशमुखांचं पुनर्वसन कसं करणार, यंदा थांबायला तयार नसलेल्या महाडिकांना भाजपवाले कसं आवरणार, असे भाबडे प्रश्न काहींना पडताहेत. पण विधानसभेचं तिकीट, विधानपरिषदेची आमदारकी, महामंडळं आणि इतर काहीबाही पत्ते हातात असलेले चलाख भाजपवाले हा तिढा सोडवतीलही...ताजा कलम : मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचं शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघात प्रत्येकानं स्वतंत्रपणानं उठावदार स्वागत केलं. कारण इच्छुकांची संख्या खंडीभर. परिणामी शिस्तबद्ध गटबाजीचं दर्शन घडलं! आता कुठं त्यांचा पक्ष ‘काँग्रेसयुक्त भाजप’ होऊ लागलाय...