शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

नागरिक छळछावणीत.. नेते नामानिराळे; सांगलीतील चिंतामणीनगरच्या पुलाचे काम बंद कोणी पाडले?

By अविनाश कोळी | Updated: September 15, 2023 16:59 IST

पुलाच्या कामावरून संशयकल्लोळ

अविनाश कोळीसांगली : दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी, नागरिक जीव मुठीत घेत सांगलीच्या जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे गेटवरील गर्दीतून वाट काढत आहेत. खराब रस्त्यावरून शरीराचे हाल करून घेताहेत. नागरिकांना अशा छळछावणीत टाकून लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, रेल्वे प्रशासन नामानिराळे झाले आहेत. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम राजकीय इशाऱ्यावरून थांबल्याचे सांगितले जात असल्याने नेत्यांबाबतचा संशयकल्लोळ वाढला आहे.सांगली ते माधवनगर या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी चिंतामणीनगरचा मुख्य रेल्वे उड्डाणपूल चांगला पर्यायी रस्ता उपलब्ध न करताच पाडण्यात आला. जुना बुधगाव रस्ता हा अत्यंत गैरसोयीचा, अरुंद व खराब रस्ता नागरिकांच्या नशिबी आला. आठ महिने वनवास भोगण्याची मानसिकता नागरिकांनी केली. मात्र, राजकारण्यांच्या दबावामुळे उड्डाणपुलाचे काम बंद पडल्याने हा वनवास आणखी काही महिने वाढणार आहे. त्यामुळे लोकांचा संताप वाढत आहे.

रुळावर गर्दी अन् लाल दिवा लागला१३ सप्टेेंबर सायंकाळी ५:३० वाजता : बुधवारी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी एकदा गेट पडले. दहा मिनिटांनी ते उघडल्यानंतर दोन्ही बाजूंना अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी झाली असतानाच साडेपाच वाजता रेल्वे येणार असल्याने लाल दिवा लागला. रुळावर अनेक वाहने होती. ती हटायला तयार नाहीत. साऱ्यांना घाम फुटला. अखेर नागरिकांनीच कोंडी कमी करीत फाटक बंद करण्यास मदत केली.

पुलाच्या कामावरून संशयकल्लोळचिंतामणीनगर रेल्वे पुलाचे काम दोन नेत्यांनी बंद पाडल्याचा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. पुलाच्या दुतर्फा दोन नेत्यांच्या इमारती असल्याने हे काम बंद पाडण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. नेत्यांनीही मौन बाळगल्याने हा संशय वाढला आहे.

ठेकेदाराकडून प्रतिसाद नाहीरेल्वे उड्डाणपुलाचे काम करणारे ठेकेदार रोहन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयावर नंतर बोलतो, असे सांगत फोन बंद केला. त्यामुळे ठेकेदाराची अडचण समजू शकली नाही.

नेते, अधिकारी गप्प का?खासदार, जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, रेल्वे प्रशासन या सर्वांना लोकांच्या वेदना समजत नाहीत का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. रस्त्याची जबाबदारी महापालिकेची, वाहतूक सुरळीत करण्याची जबाबदारी रेल्वे पोलिसांची अन् उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना दिलासा देण्याची जबाबदारी खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांची असताना हे सारे लोक मौन बाळगून आहेत.

रुग्णांनाही थांबावे लागते ताटकळतअत्यवस्थ रुग्णांना या गेटवर अडकून पडावे लागते. रुग्णवाहिकाही अर्धा, पाऊण तास या रांगेत अडकतात. याठिकाणच्या वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी रेल्वेची असताना रेल्वे प्रशासन निद्रावस्थेत आहे. रेल्वे प्रशासन कोणालाही जुमानत नसल्याने स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांमधून या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. रुग्ण दगावला तर त्याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित होत आहे.

पुलाच्या कामात बदलसांगलीतील भाजपच्या नेत्या नीता केळकर यांनी संबंधित ठेकेदाराकडे काम थांबल्याबाबत विचारणा केल्यानंतर ठेकेदाराने कामाची मार्गरेखा बदलल्याचे सांगितले. पण, त्याबाबत सविस्तर माहिती त्यांना उपलब्ध झाली नाही.

टॅग्स :Sangliसांगली