शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
2
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
3
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
4
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
5
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
6
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
7
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
8
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
9
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
10
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात
11
लेडीज डब्यामध्ये प्रवाशाकडे बाळ देऊन महिला पसार; सीवूड स्थानकातील घटना; पोलिसांकडून तपास सुरू
12
‘न्यू इंडिया’ सप्टेंबरपर्यंत सारस्वतमध्ये विलीन; ठेवीदारांच्या व्यापक हितासाठी निर्णय : ठाकूर
13
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
14
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
15
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
16
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
17
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
18
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
19
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
20
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले

मसुचीवाडी प्रकरण पेटवतंय कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:26 IST

सरपंचांपुढे मोठे आव्हान : राजकारणामुळे गावांमधील धग कायम

अशोक पाटील -- इस्लामपूर --मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणात बोरगावचे नाव बदनाम झाले आहे. महिला संघटनांनीही यामध्ये राजकारण आणल्याने हे प्रकरण गेल्या १५ दिवसांपासून धगधगत राहिले आहे. सरपंच सुहास कदम यांच्यावर पोलिसांचा दबाव असून बोरगावसह मुख्य सूत्रधार असलेल्या गुंडासह राजकारण्यांचीही भीती आहे. हे प्रकरण कोण पेटवत आहे, याबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे.मुलींना न्याय देण्यासाठी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दोनवेळा मसुचीवाडी गावाला भेट देऊन नेमके काय साध्य केले, असा प्रश्न आता ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत. मुख्य आरोपीस तात्काळ पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अन्यथा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करू, असा इशारा तृप्ती देसाई यांनी पहिल्या भेटीवेळी दिला होता. १५ दिवस झाले, मुख्य आरोपी फरारीच आहे. मग देसाई यांच्या ठिय्या आंदोलनाचे काय झाले, त्यांचा इशारा पोकळच ठरला, अशी चर्चा सुरू झाली आहे.देसाई यांच्या या भूमिकेवर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी टीका केली होती. देसाई यांनी या प्रकरणात राजकारण आणू नये, असा सल्लाही दिला होता. या घटनेनंतर १0 दिवसांनी आमदार गोऱ्हे यांनी मसुचीवाडी येथे येण्याचा घाट घातला. खरे तर मसुचीवाडी येथील वातावरण शांत झालेले आहे, आपण येऊ नये, अशी विनंती पोलिसांनी त्यांना केली होती. परंतु राजकीय हेतूने गोऱ्हे यांनी मसुचीवाडीला भेट दिली. त्यानंतर त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी पुन्हा एकदा तृप्ती देसाई यांनी मसुचीवाडीला भेट दिली. परंतु गावातील महिलांनी त्यांना कोणताही प्रतिसाद दिला. या प्रकरणात न्याय मिळत नसेल, तर आम्ही विविध संघटना, नेत्यांसमोर का जावे, असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे देसाई यांनी इस्लामपूर येथे पोलिसांना आंदोलनाचा इशारा दिला.आता सरपंच सुहास कदम यांना दूरध्वनीवरुन धमक्या येऊ लागल्या आहेत. कदम यांनी प्रसिध्दी माध्यमे, महिला संघटना आणि नेत्यांपुढे वेगवेगळे मते मांडले आहे. हे प्रकरण हाताळण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.बोरगाव आणि मसुचीवाडी गावांतील वातावरण आजही धगधगत आहे. हे वातावरण शमविण्यासाठी दोन्ही गावांतील लोकप्रतिनिधी, पोलिस व ग्रामस्थांनी एकत्र येऊन मार्ग काढणे गरजेचे आहे.